१४ वर्षे अधिक जगायचयं? तर हृदय ठेवा सुदृढ

मध्यमवयात अनेकांना हदयाचा त्रास सुरू व्हायला लागतो व हृदयविकार जडले की कोण किती जगणार याची काहीच खात्री नसते.

Updated: Nov 7, 2012, 11:19 AM IST

www.24taas.com, वॉशिंग्टन
मध्यमवयात अनेकांना हदयाचा त्रास सुरू व्हायला लागतो व हृदयविकार जडले की कोण किती जगणार याची काहीच खात्री नसते.
पण जर या वयात आपलं हृदय हे सुदृढ असेल तर मात्र आपण १४ वर्षे अधिक जगू शकतो असा निष्कर्ष एका संशोधनातून समोर आला आहे.
नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या संशोधनानुसार, हृदयविकाराचा त्रास असलेल्या व्यक्तीपेक्षा हृदय सुदृढ असलेल्या व्यक्ती या १४ वर्षे अधिक जगतात. त्यामुळे हृदय सुदृढ राहिल्याने आयुष्य देखील वाढतं.