मुंबई : जर तुम्हाला ही ऑफिसमध्ये काम करतांना झोप येत असेल तर त्यासाठी तुम्ही काय खाता हे जबाबदार आहे. समोसे, पिज्जा आणि इतर फास्टफूड झोप येण्यामागचं खरं कारण आहे.
नुकत्याच केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणानुसार जे पुरुष चरबी अधिक असणारे पदार्ख खातात ते लोक रात्री कमी झोपतात आणि दिवसा त्यांना अधिक झोप येते.
ऑस्ट्रेलिया मधील एका युनिवर्सिटीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, जे लोकं फास्टफूड अधिक खातात त्यांच्यामध्ये अनेक विकार वाढतात. झोप कमी झाल्यामुळे विकार अधिक वाढतात आणि झोप कमी होण्यामागे हे फास्टफूड अधिक जबाबदार असतात.
चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप आणि चांगला आहार अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे यावर अधिक भर दिला पाहिजे. ३५ ते ४० वयाच्या लोकांवर केल्या गेलेल्या या सर्वेक्षणात झोप आणि आहार हेच विकारांना अधिक आंमत्रित देत असल्याचं दिसलं.