औषध घेताना अशी घ्याल काळजी!

Updated: May 16, 2015, 08:32 AM IST
औषध घेताना अशी घ्याल काळजी! title=

 

मुंबई: औषध घेण्याच्या काही विशिष्ट पद्धती असतात. जर त्या पाळल्या नाही गेल्या तर समस्या आणखी वाढू शकतात. 

काय घ्याल काळजी

- जर तुम्ही नियमित आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जात असाल आणि एखाद्या नवीन डॉक्टरकडे गेल्यास तुमची मेडिकल हिस्ट्री आणि सध्या घेत असलेल्या औषधांची माहिती त्या डॉक्टरांना अवश्य द्या. कोणत्या औषधानं अॅलर्जी होत असल्यास त्याचीही माहिती डॉक्टरांना द्या.

- आपल्या मर्जीनं जुन्या प्रिसक्रिप्शनवर औषधं घेऊ नये. कारण ती औषधं त्यावेळची लक्षणं आणि आजार पाहून दिलेली असतात. 

- एखादं औषध घेतल्यावर पोट खराब होणं, स्किन इन्फेक्शन अथवा सूज आल्यास तात्काळ डॉक्टारांशी संपर्क साधा. 

- औषध रिकाम्या पोटी खायचं आहे की जेवण झाल्यानंतर खायचंय याची माहिती डॉक्टरांना विचारावी. 

- औषधाची एक्सपायरी डेट पाहावी. तारीख बरोबर असेल मात्र औषधाची अवस्था खराब असल्यास, सिल फोडलेलं असल्यास अथवा रंग खराब झालेला असल्यास ते औषध घेऊ नये. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.