www.24taas.com, मुंबई
तुमचा संपूर्ण दिवस कपाळावर आठ्या पाडून आणि ताण-तणावात जात असेल, तर नक्कीच तुमचं कुठे काही तरी बिनसलेलं असतं. पण, काही कारण नसतानाही तुमच्या कपाळाला आठ्या कायम असतील तर मात्र तुम्हाला एकदा आत्मपरिक्षण करून पाहण्याची गरज आहे. आज आपण पाहणार आहोत अशा काही गोष्टी ज्यामुळे तुमच्या दिवसाची सुरूवात तर चांगली होईलच पण त्याचा परिणाम म्हणून तुमचा संपूर्ण दिवसही मजेत जाईल.
सकारात्मक विचार
तुमच्या डोक्याला तापदायक ठरणाऱ्या गोष्टींचा सकाळी सकाळीच विचार करत बसू नका. या गोष्टी सकाळी उठल्यावरही डोक्यात ठेवल्या तर संपूर्ण दिवस खराब जाईल. तज्ज्ञांच्या मते मूड चांगला करणे आणि सकारात्मक विचारांसाठी सकाळची सुरुवातही विशेष असणे गरजेचे आहे.
अलार्म वाजताच उठा
अनेक लोक सकाळी वारंवार अलार्म ‘स्नूज’ करून झोपी जातात. मात्र, या सवयीमुळे ऊर्जा पातळीवर वाईट परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, अशा वेळी मेंदू पुन्हा आरामाच्या मुद्रेत पोहोचतो आणि थोड्याच वेळात अलार्म वाजतो. वारंवार असे होत असल्याने मेंदू थकल्यासारखा वाटतो. त्यामुळे सकाळी अलार्म वाजताच उठावे.
गडद रंग
बेडरूममध्ये नेहमीसाठी गडद आणि व्हायब्रंट रंगांचे पिलो कव्हर आणि बेडशीट्सचा वापर केला पाहिजे. सकाळी उठल्यावर ज्यामुळे ऊर्जा पातळीवर सकारात्मक परिणाम होईल अशा रंगांकडे पाहावे. रंग तज्ज्ञांच्या मते लाल, नारंगी, पिवळा किंवा मॅजेंटा यासारखे रंग खोलीमध्ये असले पाहिजेत. ब्रेकफास्टमध्ये या रंगांच्या फळांचा अवश्य समावेश करावा.
फूलदेखील फायदेशीर
बेडरूममध्ये दररोज फुलांच्या कळ्या ठेवल्या पाहिजे. ‘हार्वर्ड मेडिकल स्कूल अँन्ड हार्वर्ड युनिव्हर्सिटी’मधल्या माइंड / ब्रेन / बिहेविअर इनिशिएटिव्हच्या एका संशोधनानुसार सकाळी जाग येताच गुलाबाची फुले दिसली तर मूड चांगला राहतो आणि व्यक्ती दिवसभर तरतरीत राहते.
बिनाकामच्या गोष्टी दूर ठेवा
ज्या गोष्टी माझ्या कामाच्या नाहीत त्या आठवण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्हाला तुमचा प्रत्येक दिवस नवा भासेल.