www.24taas.com,वॉशिंग्टन
आपल्याला जास्त आयुष्य जगायचे असेल तर बसू नका तर उभे राहा, असा मंत्र देण्यात आला आहे. याबाबत अभ्यास करणाऱ्यांनी हा सल्ला दिला आहे. रोज तुम्ही तीस तासांपेक्षा जास्त वेळ बसत असाल तर ते धोक्याचे आहे. मात्र, तुम्ही उभे राहण्याची सवय लावली तर ती तुमच्या आरोग्यासाठी चांगली ठरू शकते. उभे राहिल्याने तुमचे दोन वर्षांनी आयुष्य वाढते.
‘एबीसी न्यूज’च्यानुसार अभ्यास करणाऱ्यांनी म्हटले आहे, जास्तवेळ बसल्याने आपल्या आरोग्यासाठी ते चांगले नसते. जो व्यक्ती धुम्रपान करते, त्यापेक्षा बसून राहिल्याने जास्त धोका आपल्या आरोग्याला बसतो.
तुम्ही कितीवेळ जीममध्ये घालवता, याला महत्व नाही. कारण बसण्यामुळे आपले आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे तुम्ही जास्तवेळ बसू नये. जास्त बसल्याने आपल्या जीवनातील काही दिवस कमी होतात.
लुइसियानातील एका रिसर्च सेंटरचे अभ्यासक पीटर टी काटजमारजीक यांनी सांगितले की, जास्तवेळ बसून राहिल्याने धोका पोहोचतो. हा धोका धुम्रपानापेक्षा अधिक आहे.
आपण एकाच ठिकाणी बसल्याने आपल्या शरीराची हालचाल होत नाही. त्यामुळे चालत राहिले आणि फिरल्याने शरीराची हालचाल होते. त्यामुळे आपल्या आरोग्याचे संतुलन योग्य होते. यामुळे आपल्या शरीराची चांगली कसरत होते. त्यामुळे हृदयरोगापासून सुटका होते. हृदयरोगाचा धोका कमी होतो. त्यामुळे तुम्ही चालत राहा किंवा उभे राहून काम करा, ते तुमच्या आरोग्यासाठी हितकारक आहे, हे मात्र नकी.