कॅलिफोर्निया : तीक्ष्ण बुद्धी आणि तीक्ष्ण स्मरणशक्ती हवी असेल तर तुम्हाला वापरता येणार आहे हा सगळ्यात सोपा उपाय जो तुम्हाला नेहमीच फायदेशीर ठरू शकतो.
'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'च्या संशोधकांनी त्यांच्या संशोधनात असा दावा केलाय की, कम्प्युटरवर सतत काम करताना तुम्ही करत असणाऱ्या फाईल्स सेव्ह करत राहणे तुम्हाला तुमची स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते.
संशोधक बेंजामिन स्टॉर्म म्हणण्यानुसार, सतत फाईल्स सेव्ह करणाऱ्या व्यक्तींची बुद्धी अतिशय सक्रीय असते.
या संशोधनासाठी २० विद्यार्थ्यांवर परिक्षण करण्यात आलं... आणि, फाईल्स सतत सेव्ह केल्यामुळे त्यातील गोष्टी तुम्हाला जास्त आठवणीत राहतात तसेच त्यामुळे तुमची बुद्धी सक्रीय होण्यास मदत होते, असा निष्कर्ष मिळालेल्या माहितीवरून काढण्यात आला.
हा शोध 'सायकोलॉजिकल सायन्स जर्नल'मध्ये प्रकाशित झालाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.