www.24taas.com, मुंबई
आपण लवकर थकत असाल तर, झटपट एनर्जी देणारे खाद्य आहे. हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर माहित करून घ्या. शरीराला ताजेतवान ठेवणारं खाद्य म्हणजे कोबी, पेरु, पालक, आबंट चुका (अंबाडा) आणि गाजर यातून चांगली एनर्जी मिळते. त्यामुळे तुमचा थकवा पळून जातो आणि काम करण्याचा उत्साह तुम्हाला परत मिळतो. त्यामुळे फास्टफूड खाण्याचे नेहमी टाळावे. फास्टफूड खाल्ले तर तेवढ्यापुरते बरे वाटते. मात्र, भविष्यात त्याचा त्रास सहन करावा लागतो.
सततच्या कामामुळे तुम्हाला वेळेवर जेवण घेता येत नाही. यामुळे शारिरीक आणि मानसिक थकवा येत असतो. त्याचा थेट परिणाम आपल्या स्वभाववरही होतो. वाढत्या तणावामुळे आपले मन कशातच लागत नाही. हे सर्व टाळण्यासाठी पाच खाद्य पदार्थांना आपल्या आहारात किंवा हे पाच पदार्थाला प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्साहवर्धक ऊर्जा मिळते.
पालक -
१०० ग्रॅम पालकात मोठ्याप्रमाणात कॅलरी ऊर्जा, प्रोटीन्स, कार्बोहाइड्रेट २.९ ट्क्के आढळते. पालक लोहयुक्त असल्यामुळे शरीरास आवश्यक ते कॅल्सियम, व्हिटामिन ए, बी, सी (जीवनसत्वे) मिळते. या गुणांमुळे पालकला `लाईफ प्रोटेक्टिव्ह फ़ूड` म्हटले जाते. पालकमध्ये स्कीन आणि ब्रेस्ट कॅन्सर नियंत्रित ठेवण्याची ताकद असते.
कोबी -
शरीरात तयार होणार्याय आम्ल पदार्थांवर नियंत्रण ठेवण्यात कोबी महत्वाची भूमिका बजावते. अन्य पालेभाज्यापेक्षा पत्ता कोबीमध्ये पौष्टिक तत्त्वे अधिक असतात. अनेक प्रकारच्या आजारांवर कोबी रामबाण औषध आहे. तसेच हाडे मजबूत करण्याची क्षमता या कोबीत आहे.
गाजर –
गारजामुळे आपल्याला चांगली कॅलरीज मिळते. आरोग्याचा रक्षक म्हणून गाजराकडे पाहिले जाते. अनेक आजारांना गाजर दूर ठेवते. गाजर कॅलरीज वाढवतो. कोलेस्ट्रालही गाजरामुळे नियंत्रणात राहते. मुलांच्या वाढीसाठीही गाजराचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. फुफ्फुसे, त्वचा आणि तोंडाच्या कर्करोगावर गाजर रामबाण औषध आहे.
आबंट चुका -
आबंट चुका या पालेभाजीत औषधी गुण आहेत. आपल्या दररोजच्या आहारात आंबट चुका याचा समावेश केल्यामुळे पचनक्रीया व्यवस्थीत होते. वाताच्या समस्या निर्माण होत नाहीत.
पेरु -
आयुर्वेदात पेरुला दिवसाचा हीरा म्हणूनही संबोधले जाते. ह्दयविकार तसेच कफसारखे आजारावर पेरु हे रामबाण औषध आहे. मधुमेह असलेल्या रुग्णांना देखील पेरुमुळे आराम मिळतो.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.