सावधान! 'एनर्जी ड्रिंक' प्यायल्यानं वाढतो अस्वस्थपणा!

एखाद्या अॅथेलिटला पाहून प्रेरित होऊन जर तुम्ही एनर्जी ड्रिंक प्यायला सुरूवात केली असेल. तर सावधान! कारण एनर्जी ड्रिंक प्यायल्यानं तुम्हाला झोप न येण्याची समस्या सुरू होते. तसंच अस्वस्थपणा वाढण्यासारख्या समस्यांचाही तुम्हाला सामना करावा लागतो. 

Updated: Oct 9, 2014, 02:17 PM IST
सावधान! 'एनर्जी ड्रिंक' प्यायल्यानं वाढतो अस्वस्थपणा! title=

मुंबई: एखाद्या अॅथेलिटला पाहून प्रेरित होऊन जर तुम्ही एनर्जी ड्रिंक प्यायला सुरूवात केली असेल. तर सावधान! कारण एनर्जी ड्रिंक प्यायल्यानं तुम्हाला झोप न येण्याची समस्या सुरू होते. तसंच अस्वस्थपणा वाढण्यासारख्या समस्यांचाही तुम्हाला सामना करावा लागतो. 

एका अध्ययनाच्या माध्यमातून असं लक्षात आलंय की, एनर्जी ड्रिंक प्यायल्यानं अस्वस्थपणा वाढणं आणि झोप न येणं यासारख्या समस्यांचा सामना करावा लागतोय. 'केमिलॉ जॉस यूनिवर्सिटी'नं अॅथेलिट यांच्यावर एनर्जी ड्रिंकचे चांगले आणि वाईट परिणामाचा अभ्यास करण्यात आला होता, त्यानंतर हे सिद्ध झाले आहे.

जुयान कोसो या अध्ययन कर्त्याच्या मते, एनर्जी ड्रिंक प्यायल्यानंतर स्वतःला जास्त स्वस्थ वाटावं म्हणून सर्व अॅथेलिट एनर्जी ड्रिंक पितात. त्यामुळे अस्वस्थता वाढणं आणि झोप न येणं यासारख्या समस्या उद्भवतात. अॅथेलिट खेळ सुरू होण्याआधी स्वतःला उत्तेजित करण्यासाठी एनर्जी ड्रिंक पितात.   

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.