www.24taas.com, झी मीडिया, न्यूयॉर्क
तुमचा तुमच्या कानांवर विश्वास बसो अथवा न बसो पण हे खरं आहे... मानवाच्या शरीराचा तुटलेला भाग गांडुळांच्या मदतीनं पुन्हा जोडला जाऊ शकतो. अमेरिकेतील एका १९ वर्षीय तरुणीला तिचा तुटलेला कान गांडुळांच्या मदतीनं परत मिळालाय.
संबंधित तरुणीवर एका कुत्र्यानं केलेल्या हल्ल्या केला त्यामुळे तिचा कान तुटला होता. तिच्या हातावर काही ठिकाणी अनेक जखमाही झाल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, रोड आईसलँड हॉस्पीटलचे प्लास्टिक सर्जन स्टीफन सुल्लिवन यांनी एका अनोख्या पद्धतीनं आणि प्रक्रियेच्या साहाय्यानं या तरुणीच्या कानांवर उपचार केले आणि तिचा तुटलेला कान परत जोडला गेला.
उपचारादरम्यान तरुणीच्या ठिक केलेल्या कानात धमन्यांद्वारे रक्तसंचार सुरू झाल्यानंतर रक्ताला पुन्हा शरीरात पाठवणं डॉक्टरांना जड जात होतं तेव्हा या डॉक्टरांनी गांडुळांची मदत घेतली.
सुल्लिवन यांच्या म्हणण्यानुसार, लाईव्हसायन्सप्रमाणे आपलं शरीर नव्या धमन्या विकसित करण्यासाठी सक्षम असतं त्यामुळे गांडुळांची मदत थोड्या वेळापुरतीच असते.
जेव्हापर्यंत आपलं शरीर रक्तवाहिन्या विकसित करू शकत नाहीत तेव्हापर्यंत गांडुळं शरीरात अस्थायी रक्त वाहिन्यांचं काम करू शकतात. हा नवीन शोध `न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसीन`मध्ये प्रकाशित करण्यात आलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.