सावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका

आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2016, 04:04 PM IST
सावधान ! हे पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका title=

मुंबई : आपण जेवतांना कोणतेही पदार्थ एकत्र खातो. पण आपल्याला माहित नाही की अनेक पदार्थ असे आहेत जे एकत्र नाही खाले पाहिजे. जाणून घ्या असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

खालील पदार्थ कधीच एकत्र खाऊ नका :

१. दुध : दुधासोबत दही, मीठ, आंबट वस्तू, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे या सारखे पदार्थ हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत खाणे हानिकारक आहेत.

२. दही : खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, खरबूज, मूळा या गोष्टी दही सोबत खाऊ नका.

३. तूप : थंड दूध, थंड पाणी, मद्य तुपासोबत खाणे हानिकारक ठरू शकते.

४. मध : मूळा, खरबूज, तूप, द्राक्षे, पाणी आणि गरम पाणी मधानंतर घेऊ नका.

५. फणस : फणस खाल्यानंतर पान खाणे धोक्याचे ठरते.

६. मुळा : मुळा आणि गुळ एकत्र खाणे नुकसानदायक असते.

७. खीर : खिचडी, आंबट पदार्थ, फणस कधीही खीर सोबत खाऊ नका. 

८. थंड पाणी : शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दूध किंवा गरम भोजन यानंतर थंड पाणी कधीच पिऊ नका.

९. कलिंगड : पुदीना किंवा थंड पाणी कलिंगड खाल्यानंतर घेऊ नका.

१०. चहा : काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी चहासोबत कधीच घेऊ नका.

११. मासे : दुध, उसाचा रस, मध यांचं सेवन मासे खातांना कधीच करू नका.

१२. मांस : मांस खात असतांना मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.

१३. गरम जेवण : थंड जेवण, थंड पेय गरम अन्न खात असतांना घेणं हानिकारक असतात.

१४. खरबूज : लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दूध किंवा दही खरबुजासोबत खाणे नुकसानकारक असते.

१५. तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तू उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादी कधीच खाऊ नये. या वस्तू विष युक्त होतात. अशा भांड्यमध्ये बराच वेळ ठेवलेले पदार्थ खाऊ नयेत. 

१६. अ‍ॅल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने किंवा उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.