अॅस्पिरिन, डिस्पिरिनच्या खुल्या विक्रीवर बंदी!

दिल्ली सरकारनं अॅस्पिरिन, डिस्पिरिन, ब्रूफेन, वॉवरन यांसारख्या नॉन-स्टेरॉयडल अॅन्टी इनफ्लेमॅटरी औषधांच्या खुल्या विक्रीवर एक मोठा निर्णय घेतलाय. ही औषधांच्या खुल्या विक्रीवर १५ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलीय. 

Updated: Jul 4, 2015, 11:20 PM IST
अॅस्पिरिन, डिस्पिरिनच्या खुल्या विक्रीवर बंदी!  title=

नवी दिल्ली : दिल्ली सरकारनं अॅस्पिरिन, डिस्पिरिन, ब्रूफेन, वॉवरन यांसारख्या नॉन-स्टेरॉयडल अॅन्टी इनफ्लेमॅटरी औषधांच्या खुल्या विक्रीवर एक मोठा निर्णय घेतलाय. ही औषधांच्या खुल्या विक्रीवर १५ ऑगस्ट ते ३० नोव्हेंबरपर्यंत बंदी घालण्यात आलीय. 

डॉक्टरांनी रुग्णांना या औषधांचं सेवन करण्याची लिखित सूचना केली असेल तरच ही औषधं रुग्णांना उपलब्ध होतील. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणत्याही मेडिकलमध्ये ही औषधं मिळणार नाहीत.

विशेष तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या औषधांमुळे डेंग्युच्या रुग्णांना धोका निर्णाण होऊ शकतो. तसंच यांमुळे हॅमरेजची लक्षणंही दिसून येऊ शकतात... शिवाय डेंग्युच्या रुग्णांचा जीव जाण्याचाही धोका आहे. त्यामुळे सरकारनं हा निर्णय घेतलाय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.