मुंबई : कान हा आपल्या शरीरातील महत्त्वाचा अवयव आहे. कानदुखी हा खूप कष्टदायक आणि वेदनादायक असतो. त्यावर अनेक घरगुती उपाय आपण करु शकतो.
१. कान दु:खी : कान दुखत असल्यास गरम पाण्याच्या पिशवीने कान शेकावा. तेल घालू नये.
२. कानात काही गेल्यास : पाखरू, किटक, काडी वगैरे अशा गोष्टी गेल्यास तज्ञ डॉक्टरांकडून काढून आणावी. आपणच कान कोरणे वगैरे प्रकार करून नये.
३. कान फुटणे : नाकातल्या संसर्गामुळे काही वेळा स्त्राव कानावाटे बाहेर पडतो. त्यावर सर्दी बंद होईल असे उपाय करावेत.
४. कानात मळ साठल्यास : कान शेकावा म्हणजे आतील मळ कोरडा होऊन आपाआप बाहेर पडतो. काही वेळा मात्र कानातील काही स्त्रावांमुणे मळ चिकटून बसतो. अशा वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार करून मळ काढावा.
५. कान चिघळणे : बरेच वेळा कानात डूल, दागिने घातल्याने अथवा कान टोचून घेतल्याने ते चिघळतात. त्यावर तेल लावावे. त्यामुळे चिघळणे बंद होते. कान फारच चिघळून तेथे संसर्ग होत असेल तर मात्र डॉक्टरी सल्याने इलाज करावेत.