मुंबई : अनेकांच्या आहारात अंड हा महत्त्वाचा घटक बनला आहे. थंडीमध्ये मोठ्या प्रमाणात अंडींचं सेवन केलं जातं. अंड्यामध्ये अनेक पोषक घटक असतात ज्याचा तुमच्या शरिरावर मोठा परिणाम होत असतो. पण तुम्ही ती कशी आणि केव्हा खाता याला महत्त्व आहे.
१. शरिरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी अंडी महत्त्वाचं काम करतात.
२. अंड्यांपासून मोठ्या प्रणाणात प्रोटीन मिळतात.
३.थंडीत दररोज 2 अंडी खायला हवी.
४. पंचविशीनंतर प्रौढत्वाकडे वाटचाल सुरू होते त्यामुळे अंड्याचं सेवन फायदेशीर असतं.
५. वयाच्या 40 वर्षानंतर आरोग्याप्रमाणे अंड्याचं सेवन करावं.
६. वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांनी पांढरा बलक सेवन करावा. त्यामध्ये कॅलरीज योग्य प्रमाणात असतात.
७. अंडी डीप फ्राय करून खाल्याने शरिरातील फॅट वाढतात. अंडी तळल्यानंतर त्यातील कोलेस्टरॉलचं प्रमाण वाढतं. त्यामधील पोषणमूल्य कमी होतात.
८. अंडी फ्राय करून किंवा अती उकडून खाणं अयोग्य आहे. जरा वेळ उकडून किंवा हाफ फ्राय करून खाणे अधिक लाभदायक ठरतं.
वजन कमी असणाऱ्यांनी अंड्यातील पिवळा भाग खावा. कारण यामध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात.