संतोष टाकळे
(मॅनेजर - कॉर्पोरेट कम्युनिकेशन)
कोर्टाच्या गंभीर वातावरणातून बाहेर पडलो आणि कर्वे रोडच्या कामत हॉटेलात मी आणि निरीजाने कॉफी ऑर्डर केली. निरीजा पार कोसळली होती. तिला मानसिक आधाराची गरज तर होतीच शिवाय तिला एका चांगल्या डॉक्टर कडे न्यायला हवं होत. मी एकाच दिवसाची रजा घेवून आलो होतो. त्यातही पुण्यात मला हल्ली जास्त वेळ राहवत नाही . काय दिवस होते ते मी निरीजा , किरण , अविनाश , प्रिया आणि सोमेश आमचा मास मिडियाचा ग्रुप रोज नवे प्लान्स आज काय पार्वतीला जावूया एकाद्या रविवारी सिंहगड ठरलेला आणि मुक्काम मात्र निरीजाच्या निसर्ग बंगल्यावर कॉलेजच्या प्रत्येक फेस्टिवल मध्ये आमचा ग्रुप अव्वल ... दिवस उलटत होते आणि आमच्यातला जिव्हाळा अधिक घट्ट होत होता. मास मिडिया अगदी नसानसात भिनलेला. आमच्या निसर्गच्या ओपेन टेरेसवर चालेले वाद -विवाद तात्त्विक आणि शाब्दिक चकमकीत उफाळून येत. निरीजाच्या याच बंगल्यात मी , अविनाश आणि सोमेश पेयिंग गेस्ट म्हणून राहत असू त्याकाळात फक्त ७०० रुपयात मिळालेली हि प्रशस्थ जागा एक मोठा हॉल, छोटंसं किचन अभ्यासाची खोली त्याला लागून एक निवांत ग्यालरी मी बरीच पुस्तकं इथ बसून वाचलीत अगदी तासान तास, निसर्ग बंगल्यातल हे सर्वात श्रीमंत ठिकाण इथं विचारांची निर्मिती झाली, प्रेमाच्या नव्या कोवळ्या पालवीला जोम आला आणि इथंच काही बिनसलं तर दोन पेग म्हणता म्हणता १ खंबा रिकामा झाला.
निरीजा आणि किरणच जमलं ते याच ग्यालरीत तिला चक्क मिठी मारून त्याने किस केल्याच आम्ही या डोळ्यांनी पाहिलं आणि दो दिल मिल रहे हैं मगर चुपके चुपके गाणं सर दिशि ओठांवर रेंगाळून गेलं. निरीजा कोकणस्थ ब्राम्हण आणि किरण साताऱ्याच्या निंबाळकर घराण्याचा युवराज कसं जमेल हे सगळं कुणास ठावूक निरीजाच्या वतीने मीच घरी बोललो कुलकर्णी काका तेंव्हा फार समंजस पणे वागले आणि मग युवराजच्या म्हणजे किरणच्या घरी कळवाव म्हणून मी किरण आणि कुलकर्णी काका साताऱ्याच्या दिशेने मार्गस्त झालो. शनिवार होता. रस्ता तसाहि काही मोकळा नव्हता कुलकर्णी काकांची सफारी गाडी वेगात रस्ता कपात होती. मी आणि किरण मागे हळू आजावत काय बोलावं कसं बोलावं कुणी सुरवात करायची याची तयारी करत होतो . काकांच्या चेहऱ्यावर मात्र एक ताण जाणवत होता आणि तो साहजिकच असावा .पहाटेच्या सुमारास आम्ही जयसिंग वाडीला पोहचलो आणि गाडी किरणच्या भल्या मोठ्या वाड्या समोर थांबली. गडी माणसं लगबगीनं आली आमच्या ब्यागा आत गेल्या आणि किरणचे आबा सोफ्यात बसून आमची वाट पाहत बसलेले दिसले किरण आबांना जावून बिलगला आणि आबांनी या पाव्हणं म्हणत रांगडी आवाजात स्वागत केलं माडीवरच्या खोलीत आमची व्यवस्था चोख होती दिमतीला दोन गडी अगदी राजेशाही थाट पण आमचं सगळं लक्ष मूळ विषयाकडे काय होतंय कोण जाणे ....
उफळत्या चहाचे कप सोफ्यात आले. सोबत काही बिस्किट चहा कसा बसा गळ्यात उतरवला आणि मी विषयाला हात घातला माझा वय तेव्हा अगदी २० - २२ नुकताच मिसुरड फुटलेलं हे कालच पोर काय बोलतय म्हणून आबांचा राग अनावर झाला किरणला फैलावर घेत त्यांनी चार शिव्या हासडत हे अजिबात होणार नाही असा निर्णय दिला आल्या पावली परत जा म्हणत ते सोफ्यातून उठले आणि गड्यांना घेवून थेट मळ्याच्या वाटेला लागले किरणची आई डोईवरचा पदर सावरीत म्हणाली कारभारी म्हणतात तो शब्द शेवटचा आम्ही त्यापूढ जात न्हाई .किरण ने मान जी खाली घातली ती आम्ही तिथून निघे पर्यंत काही वर केली नाही .आम्ही हताश पणे पुन्हा पुण्यात आलो. निसर्गच्या गेट पाशी पोहचलो आणि काका म्हणाले लगेच काही बोलू नकोस जेवणं उरकली कि विषय काढू मी चेहरा हसरा केला आणि निरीजाला हाय केलं ती ग्यालरीत रेलून आमची वाट पाहत होती ..
विषय एव्हाना संपला होता आमच्या परीक्षा उरकल्या होत्या. दोन वर्ष ज्या निसर्ग बंगल्यात आम्ही आमच म्हणून वावरलो त्याला निरोप देताना भिंती खायला उठल्या कोण बोलणार होत त्यांच्या सोबत आमचे वाद विवाद , नुकताच सुचलेली ताजी ताजी कथा आणि भावनांच्या गुंत्यात भिजलेल्या कवितेच्या ओळी सारं काही याच निसर्गच्या चार भिंतीत साजरं झालेलं. पण निघण भाग होतं. निरीजा खूप रडली मला मिठी मारून म्हणाली तू खूप केलंस अगदी सख्या भावापेक्षा पण माझं कदाचित हे असच होणारं असेलं .
.... त्या नंतर दोन वर्षांनी निरीजाचा अचानक कॉल आला येत्या ९ तारखेला पुण्यात ये आत्ता काही विचारू नकोस आल्यावर सांगते आणि तिचा फोन ठेवतोय इत