www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
महाराष्ट्रात रणसंग्रामाला सुरुवात झालीय. विदर्भातल्या १० जागांसाठी आज मतदान झालं. राज्यात पहिल्या टप्प्यात ६१.१० टक्के मतदान झाले. सकाळपासूनच मतदारांमध्ये उत्साह दिसून येतोय. भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेवार, काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक, भारिप बहुजन संघाचे नेते प्रकाश आंबेडकर या दिग्गज नेत्यांचे भवितव्य मतपेटीत बंद होणार आहे. मतदानाच्या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
मतदानाची आत्तापर्यंतची स्थिती
सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान
अमरावती – ६५ टक्के
रामटेक – ५५.५४ टक्के
नागपूर – ५२.२० टक्के
यवतमाळ -६०.१० टक्के
चंद्रपूर – ६५.१० टक्के
अकोला – ६५ टक्के
भंडारा-गोंदिया – ६१ टक्के
वर्धा – ६४ टक्के
गडचीरोली – ६१ टक्के
बुलडाणा – ५८.६६ टक्के
दुपारी ५ वाजेपर्यंत मतदान
विदर्भात सरासरी ५५ टक्के मतदान
गडचिरोली -चिमूर - ६४ टक्के
नागपूर - ५२.३२ टक्के
बुलडाणा - ५५ टक्के
रामटेक - ५१ टक्के
वर्धा - ५८.०८
अमरावती - ५७.२
अकोला - ५२.९०
भंडारा-गोंदिया - ६०.६०
चंद्रपूर - ५९.६०
यवतमाळ - ५१.२६
दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान
बुलडाणा - ४० टक्के
अकोला - ४२
अमरावती - ४८
वर्धा - ४१
रामटेक - ३७
नागपूर -४०
भंडारा - ४२. ८७
गडचिरोली - ४४
चंद्रपूर - ४३.२६
यवतमाळ - ३९.९३
दुपारी २ वाजेपर्यंत मतदान
नागपूर - ३९.२५ टक्के
रामटेक - ३६.४० टक्के
दुपारी १ वाजेपर्यंत मतदान
नागपूर - २६.१५ टक्के
रामटेक - २५.२० टक्के
अकोला - २९.६० टक्के
अमरावती - ३२.१७ टक्के
वर्धा - २७.४६ टक्के
बुलढाणा - ३२.४० टक्के
चंद्रपूर - ३०.२० टक्के
यवतमाळ - २९.६७ टक्के
गडचिरोली - ४४ टक्के
भंडारा - ३१.१४ टक्के
दुपारी १२ वाजेपर्यंत
* नागपूरमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी मतदान केलं. नागपूरातून नितीन गडकरी निश्चित विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.
* अकोला लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार संजय धोत्रे यांनी आपल्या पळसोबढे या आपल्या मुळगावी मतदान केल. संजय धोत्रे यांनी आपल्या कुटुंबीयांसह रांगेत उभे राहत मतदानाचा हक्क बजावलाय. अकोल्यात भाजपचे संजय धोत्रे यांची लढत भारीप-बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसच्या हिदायत पटेल यांच्याशी आहे.
* अकोला लोकसभा मतदार संघातले उमेदवार आणि भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीही अकोल्यात आपला मतदान हक्क बजावलाय. अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी महाविद्यालयातल्या मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं.
* चंद्रपूरचे विद्यमान खासदार हंसराज अहिर यांनीही सामान्य मतदारांसह रांगेत उभं राहून मतदान केलं. पहिल्यांदाच मतदार करणाऱ्या रघुवीर आणि श्याम या आपल्या दोन मुलांसह हंसराज अहिर यांनी हिंदी सिटी शाळेत जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी मतदारांमध्ये उत्साह असून मतदान मतदानाच्या प्रमाणात वाढ होईल असा विश्वास अहिर यांनी व्यक्त केला.
* ज्येष्ठ समाजसेवक विकास आमटे आणि त्यांच्या पत्नी भारती आमटे यांनी देखील आज आपला मतदानाचा हक्क बजावला.वरोरा आनंदवन येथे उभयतांनी मतदान केलं.
* नागपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार विलास मुत्तेमवार यांनी मतदान केलं. भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांच्य़ाशी त्यांची लढत होतीय.
* भंडारा मतदार संघातले भाजपचे उमेदवार नाना पटोले यांनी पूजा अर्चना करुन सहपरिवार मतदान केलं.
सकाळी १० वाजता
अकोला : १२ टक्के
नागपूर : ७.११ टक्के
बुलडाणा : ७.३६ टक्के
चंद्रपूर : ६.९६ टक्के
गडचिरोली : १०.२१ टक्के
वर्धा : ७ टक्के
यवतमाळ-वाशिम : ५.८४ टक्के
अमरावती : ५.२० टक्के