मुंबईत केवळ लोंढे वाढतायत, `मतदार` नाही!

मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... मुंबईत मोठे लोंढे येत असतानाही मुंबईची मतदारांची कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 19, 2014, 06:21 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईकरांसाठी ही एक महत्त्वाची बातमी... मुंबईत मोठे लोंढे येत असतानाही मुंबईची मतदारांची कमी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तसं पाहिलं तर ही एक सामान्य बातमी... पण, वेगवेगळ्या पैलूंमधून पाहिलं तर या बातमीचे अनेक कंगोरे निघू शकतात... आणि त्यामुळेच अनेकांसाठी ही बातमी महत्त्वाची ठरते.
संपूर्ण मुंबईची लोकसंख्या दीड कोटी पेक्षा जास्त फुगत चालली आहे. मात्र, मुंबई शहरातील मतदारांची संख्या मात्र घटताना दिसत आहे. ताज्या माहितीनुसार, २०१० पासून आता पर्यंत तब्बल ४ लाख ८५ हजार ५०६ मतदार मुंबई शहर सोडून गेले आहेत. मुंबई शहरातील जागेच्या वाढत्या किंमती हे यामागचे मुख्य कारण आहे.
काय सांगते आकडेवारी...
२०१० च्या मतदार यादीनुसार मुंबई शहरात २७ लाख ९५ हजार वोटर्स होते... तर ताज्या मतदार यादीनुसार २०१४ मधे मतदारांची संख्या २३ लाख ९ हजार ४९४ एव्हढी झाली. म्हणजेच तब्बल ४ लाख ८५ हजार ५०६ मतदार हे मुंबई शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाले आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांत जागेच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे आता मुंबई शहरात फक्त श्रीमंतच लोक जागा घेऊ शकतात. यामुळे सर्वसामान्य मुंबईकर मात्र शहर सोडून चाललेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.