www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली आयटम गर्ल राखी सावंतनं आता स्वतःचा नवा पक्षच काढलाय. राष्ट्रीय आम पार्टी या पक्षाची तिनं घोषणाच करून टाकली आहे.
आपल्या एरियातल्या लोकांच्या आग्रहावरूनच निवडणुकीला उभी राहिल्याचंही ती म्हणतेय. आपण नेत्यांचं काम करू शकतो, मात्र या नेत्यांनी माझं अभियन आणि नाचाचं काम करून दाखवावं, असं आव्हानच राखीनं दिलंय. तर`राष्ट्रीय आम पार्टी`च्या राखीने काही घोषणा केल्या आहेत.
आपण नक्कीच निवडून येणार आहोत. मी निवडणून आल्यानंतर लोकांची कामं करणार आहे. मी जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण करणार आहोत. महिलांची सुरक्षा याला आपले प्राधान्य असेल. तर मोफत कराटे प्रशिक्षण महिलांना दिले जाईल, असे राखीने यावेळी सांगून टाकलेय.
आपली लढत ही काँग्रेस उमेदवार गुरुदास कामत यांच्याशी आहे. कारण ते या मतदारसंघात फिरकलेच नाहीत. आता त्यांना हा मतदार संघ दिसत आहे. आपण निवडूण आल्यानंतर जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्य देईन. मतदार संघात जाईल, असे राखीने सांगितले.
याआधी उत्तर-पश्चिम मुंबई मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढविण्याची तयारी राखीने चालवली होती. याबाबत अधिकृत घोषणा करण्याचे राखीने सूचित केले होते. मात्र, तिने पक्ष स्थापन करून राजकारणात प्रवेश केला. राखी सावंतने याआधीही राजकारणात येण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी तिने स्वच्छता मोहीमही राबवली होती. एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांचे गुणगान करणाऱ्या राखीने काही दिवसांपूर्वी दिल्लीतील भाजप मुख्यालयालाही भेट दिली होती. भाजपकडून आपल्याला एखादे तिकीट मिळेल, अशी आशा तिला होती. मात्र, ती फोल ठरली. त्यामुळे तिने हा पक्ष काढल्याचे दिसून येत आहे.
उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे गजानन कीर्तिकर, काँग्रेसचे विद्यमान खासदार गुरुदास कामत, मनसेचे महेश मांजरेकर व `आप`चे मयांक गांधी नशीब आजमावत आहेत. आता राखी राजकीय मैदानात उतरल्याने या मतदार संघाकडे लक्ष लागले आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ