www.24taas.com, झी मीडिया, बिजनौर
समाजवादी पार्टीचे वरिष्ठ नेते आझम खान यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा आपलं थोबाड उघडलं... यावेळी त्यांनी `आणीबाणीच्या काळात जबरदस्तीनं नसबंदी करण्यासाठी तसंच अयोध्येच्या वादग्रस्त स्थळावर `शिलान्यास` घडवून आणण्यासाठी अल्लाहनंच संजय गांधी आणि राजीव गांधी यांना शिक्षा दिली` असं म्हटलंय.
संजय गांधी यांनी आणीबाणीच्या काळात सक्तीच्या नसबंदीची मोहीम राबवली होती, तर राजीव गांधी यांनी बाबरीचे दार खुले करून देऊन तिथे ‘शिलान्यास’ घडवला होता. त्याची शिक्षा त्या दोघांनाही ‘अल्लाह’कडून मिळाली आहे, असं खान यांनी म्हटलंय. लोकसभेची ही निवडणूक नुसती निवडणूकच नाही तर फॅसिस्ट शक्तीविरुद्धचं युद्ध आहे, असं म्हणत अल्पसंख्याकांना ही लढाई जिंकावीच लागेल. मुसलमानांच्या मतांची विभागणी त्यांच्यासाठी आत्मघातकी ठरेल, असंही म्हणत त्यांनी पुन्हा एकदा जनतेला भडकावण्याचं काम केलंय.
संजय गांधी १९८० साली दिल्लीतील एका विमान अपघातात ठार झाले होते तर राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी चेन्नईजवळ हत्या करण्यात आली होती.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.