www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
गांधी घराण्यातील राहुल आणि वरूण या चुलत बंधूंमध्ये `भाईचारा` निर्माण होतोय. हा भाईचारा भाजपला अडचणीत आणणारा ठरलाय. वरुण यांनी आपल्या वडील भावाच्या अमेठीतील कामाची जाहीर स्तुती तर केलीच; पण आपण शब्द मागे घेणार नाही, असेही बजावले.
वरुण गांधी यांनी अमेठीतील विकासाची जाहीर स्तुती केली. त्यांची भूमिका पक्षाच्या भूमिकेच्या विरोधात आहे. भाजपने अमेठीतून रिंगणात उतरविलेल्या स्मृती इराणी यांच्याकडे अमेठीत विकास नाही, या टीकेशिवाय दुसरा मुद्दा नाही. या अनपेक्षित वरुणास्त्राला प्रतिकार करता न आल्याने भाजप पुन्हा धर्मसंकटात सापडला.
दरम्यान, पक्षप्रवक्ते प्रकाश जावडेकर यांना या मुद्द्यावर उत्तरच देता आले नाही. वरुण यांनी कोणताही पक्ष वा व्यक्तीची स्तुती केलेली नाही. वरुण गांधी यांचे तिसरे ट्विट येण्याची वाट पाहा, अशी केविलवाणी सारवासारव जावडेकरांनी केली.
वरूण गांधी यांनी राहुल गांधी यांची केलेली स्तुती स्मृती इराणी यांनी फेटाळून लावलीय. तसेच अमेठी मध्ये तरुणांना काँग्रेसला रोजगार देता आला नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. स्मृती नागपूर येथे नितीन गडकरी याच्या प्रचारासाठी नागपूरला आल्या असता पत्रकारांशी बोलत होत्या. शरद पवार यांना सत्याचा स्वीकार करावा असा सल्लाही त्यांनी दिलाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ