निवडणुकीच्या गर्मीनंतर नेते होत आहेत `कूल`

लहान मुलं जशी उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जातात. तसंच ज्या राज्यात आता निवडणुका संपल्या आहेत.

Updated: Apr 30, 2014, 05:04 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
लहान मुलं जशी उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जातात. तसंच ज्या राज्यात आता निवडणुका संपल्या आहेत. त्या राज्यातील नेते सुट्टीवर गेले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, १६ मे रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याआधीच अनेक दिग्गज नेत्यांनी आपआपल्या आवडत्या ठिकाणी फिरायला गेले आहेत.
इन्फोसिसचे माजी सीईओ आणि लोकसभेत काँग्रेसकडून दक्षिण बंगळूरूचे उमेदवार असलेले नंदन निलेकणी सध्या कर्नाटकातील बंदीपूर अभयारण्यात आपल्या पत्नीसह वाघांच दर्शन घेत आहेत. निलेकणी गंमतीत म्हणतात, ` लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारसभा आणि भाषणांमुळे माझं पाच किलो वजन कमी झालंय. आता वजन वाढवण्यासाठी मी फिरतोय आणि मजा करतोय.`
प्रचार न झेपल्यामुळे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे शिंदे तर चक्क आजारीच पडल्या आहेत. या कारणानेच आपल्या आजारपणातून बाहेर येण्यासाठी वसुंधरा राजे धौलपूरला गेल्या आहेत. धौलपूर हे राजस्थानमध्ये ऐतिहासिक स्थळ म्हणुन प्रसिद्ध आहे. उन्हाळा खूपच वाढल्याने तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता या सध्या नीलगिरीतील कोडानाड या थंड हवेच्या ठिकाणी रहायला गेले आहेत.
ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक हे नऊ दिवसांसाठी दिल्लीला गेले आहेत. तर तरूण खासदार म्हणुन ओळखले जाणारे द. मुंबईचे विद्यमान खासदार मिलिंद देवरा हे मुंबईतच राहून आपल्या फिटनेससाठी जिममध्ये वेळ देत आहेत. तसेच व्यायाम, गुड फूड, संगीत आणि गिटारला देखील वेळ देत आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.