www.24taas.com, ठाणे
करून दाखवलं करून दाखवलं, हा काय भांगडा आहे की काय, करायचं काही नाही आणि म्हणे करून दाखवलं. आता हेलिकॉप्टरमधून फिरायचं आणि म्हणा वरून दाखवलं, अशा कडक शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या करून दाखवलं या कॅम्पेनवर तोंडसुख घेतलं.
ठाण्याच्या सेंट्रल मैदानात राज ठाकरे यांची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात राज ठाकरे यांनी शिवसेना, उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रत्येक महापालिकेतील सत्ताधारी पक्षांना धारेवर धरले.
आज ठाण्यात सभा घेत आहेत, उद्या पुण्यात आहे आणि १३ तारखेला मुंबईत घेऊ दिली तर ठिक आहे. नाही तर मी माझं हत्यार उपसणार असा इशाराही राज ठाकरे यांनी यावेळी दिला. गल्लीत फटाके वाजवायचे नाही, तर मैदानात जा. पण मैदानात सायलन्स झोन मग कुठं संडासात फटाके वाजवायचे का?, असा टोलाही त्यांनी लगावला.
हे करायचं नाही, ते करायचं नाही. मग नगरसेवकही हायकोर्टाने ठरवा आणि आमदारही हायकोर्टाने ठरवावे, झक मारायला घेतात या निवडणुका!, आम्ही गोष्टी पाळतो आहे. पण दोन्ही पाय बांधायचे आणि म्हणायचं धावबाकीचे मानत असतील मी नाही मानतं. या सर्व संस्थांचा आदर करतो पण मर्यादेपर्यंतच जास्त बाजूला नेऊन भिंतीला माझी पाठ लावण्याचा प्रयत्न केला तर मीही नख दाखवेल, असा ठाकरी इशाराही त्यांनी यावेळी दिला.
राज ठाकरेंच्या भाषणातील काही ठळक मुद्दे
- सर्व शहरांचा विचका करून टाकला आहे.
- घरातून बाहेर पडतील आणि तिथं थांबतील. ट्रॅफिक जॅम
- १३ तारखेला मुंबईला सभा घ्यायला दिली तर ठिक नाही तर मी हत्यार उपसणार
- माझी कोणीही वेडी वाकडी कोंडी करू शकत नाही. धसका घेतला आहे माझा.
- गल्ली फटके वाजवायचे, मैदानात फटाके वाजवाचे नाही मग काय संडासात वाजवू फटके
- हेही करायचे नाही, तेही करायचे नाही. मग करायचं तरी काय?
- नगरसेवक ही हायकोर्टाने ठरवावे, आणि आमदारही हायकोर्टाने ठरवावे.
- आम्ही गोष्टी पाळतो आहे. पण दोन्ही पाय बांधायचे आणि म्हणायचं धाव
- बाकीचे मानत असतील मी नाही मानतं. या सर्व संस्थांचा आदर करतो पण मर्यादेपर्यंत
- जास्त बाजूला नेऊन भिंतीला माझी पाठ लावण्याचा प्रयत्न केला तर मीही नख दाखवेल.
- करायचं काही नाही आणि म्हणायचं करून दाखवलं
- हेलिकॉप्टरवरून फिरायचं आणि म्हणायचं 'वरून दाखवले'
- नरेंद्र मोदींनी नाही म्हटलं 'करे छे'
- पाच दहा वर्षांपूर्वी सांगितलेल्या गोष्टीत जाहीरनाम्यात
- राज ठाकरेंनी केली युतीच्या जाहीरनाम्याचा पंचनामा
- ठाण्यात फेरीवाले वाढतात.
- मी विरोधासाठी विरोध नाही करणार, मतभेद असले तरी चांगले काम तर
- मला वीट आला, त्याच निवडणुका, तेच विषय
- २० वर्षे सत्ता असलेले सत्ताधारी मतदारांना गृहीत धरतात.
- टू व्हिलर- थ्री व्हिलर कंपन्यांमुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था विस्कळीत
- गुजरातची स्तुती करतो हा, पण काय बोललो हे सांगायचे नाही.
- महाराष्ट्र आजही एक नंबरला आहे. पण राज्य सरकार आणि महापालिकेत ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्यामुळे उद्योग गुजरातमध्ये सुरू आहे.
- महाराष्ट्राचा गलथान कारभार असाच राहिला तर गुजरात पुढील १० वर्षात क्रमांक १ वर जाईल.
- देशातील सर्वाधिक स्थलांतर ठाणे जिल्ह्यात, मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये
- उत्तर प्रदेशात ट्रेन भरून भरून जात आहेत. ते तिथं मतदान करणार आणि पुन्हा १६ तारखेला हे परप्रांतीय महापालिकेला मतदान करतील
- मराठी माणूस अल्प संख्याक होत आहे.
- महापालिकेच्या शाळा बंद होत आहे आणि खासगी शाळा वाढताहेत
- महापालिका आणि राज्य सरकारला सार्वजनिक उपक्रम बंद पाडायचे आहेत.
- हे शहर घडवण आणि राज्य घडवण हा माझा पॅशन आहे
- मला गरज नाही, पळावापळवी करायची मला माझ्या पक्षातील लोकांवर माझावर विश्वास आहे.
- सर्व पक्षांनी विचका करून ठेवला आहे.
- सर्वाधिक गुन्हेगार उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मुंबईत येतात.
- पेवर ब्लॉक लावा टक्के कमवा, हा सत्ता धाऱ्यांचा धंदा
- सचिन तेंडुलकरची सेंच्युर