पंतप्रधान डॉ. मनमोहन सिहांचा `गुड बाय`

पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज साऊथ ब्लॉक कार्यालयामधील त्यांच्या पर्सनल स्टाफच्या कर्मचाऱ्यांना निरोप दिला.

Updated: May 14, 2014, 12:09 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज साऊथ ब्लॉक कार्यालयामधील त्यांच्या पर्सनल स्टाफच्या कर्मचाऱ्यांना निरोप दिला.
लोकसभा निवडणुकीचा निकाल आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्‍वभूमीवर कर्मचाऱ्यांना हा निरोप देण्यात आला आहे.
आपल्या कारकिर्दीमध्ये सहकार्य दिल्याबद्दल पंतप्रधानांनी या कर्मचाऱ्यांचे आभार मानले. या कर्मचाऱ्यांची संख्या एकूण 110 इतकी आहे.
पंतप्रधान कार्यालयामध्ये हा कार्यक्रम पार पडला. याबरोबरच, पंतप्रधानांनी इतर 400 कर्मचाऱ्यांनाही धन्यवाद दिले.
मनमोहन सिंग हे येत्या शनिवारी आपली मंत्रिमंडळाची अखेरची बैठक घेतील. यानंतर सिंग हे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची भेट घेऊन सिंग हे देशास संबोधित करणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.