www.24taas.com, झी मीडिया, गोंडा
आपल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल नेहमीच केंद्रीय मंत्री बेनी प्रसाद वर्मा हे चर्चेत असतात. या वेळी देखील बेनी प्रसाद यांनी नरेंद्र मोदी,भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कटू शब्दात टीका केली आहे. बेनी प्रसाद हे गोंडा येथे एका मुस्लिम बहुभाषिक भागात प्रचार करत होते.
बेनी प्रसाद यांनी `आरएसएस`ला गुंडांची संघटना म्हणून संबोधलं आहे. तसेच आरएसएस ही मुसोलिनीच्या संघटनेसारखी आहे आणि या दोन्ही संघटनांचे कपडे देखील सारखे आहेत. अशा शब्दात बेनी प्रसाद वर्मा यांनी `आरएसएस`वर टीका केली.
यावेळी बोलताना बेनी प्रसाद यांनी मोदींवर देखील वैयक्तिक टीका केली. बेनी प्रसाद म्हणाले, `मोदींनी जास्त अभ्यास केलेला नाही. मोदी १८ व्या वर्षीच पळून गेले होते. मोदींना त्यांची पत्नीपण सांभाळता येत नाही. मोदी हरणार आहेत. राहुल गांधीच पंतप्रधान होणार आहेत. गोध्राचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालेल आणि मोदी तुम्हाला कारावास भोगावा लागेल`. अशा शब्दात मोदींवर बेनी प्रसाद वर्मांनी मोदींवर टीका केली.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.