प्रमुख मुद्दे : `अर्थसंकल्प २०१४-१५`

विधीमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प २०१४-१५ सादर केला.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Feb 25, 2014, 03:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिय, मुंबई
विधीमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विधानसभेत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प २०१४-१५ सादर केला.

शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतील जनतेला खूश करण्याचा प्रयत्न अजितदादांनी या अर्थसंकल्पात केलेला दिसतोय.

अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे...
* पोलीस विभागाची ६१,४९४ पदं भरणार
* सोलापूर चादर, मनुका स्वस्त होणार
* सिंहस्थ कुंभमेळा - २३७८ कोटी
* व्याघ्र आणि पक्षीसंवर्धन - ३५ कोटी
* मराठीसाठी १५ कोटी ६० लाख
* नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा २०१८ पर्यंत
* राज्यातील नवीन विमानतळ उभारणीसाठी १६५ कोटी
* वीज मागणीपैकी ९७ टक्के मागणी पूर्ण होतेय
* वीजदरात सवलतीसाठी ९हजार कोटींची तरतूद
* अमळनेरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करणार
* महिला बालसुरक्षेसाठी १०५ समुपदेशन केंद्र स्थापणार
* जलस्वराज्य योजना देशात पहिल्यांदाच
* मौलाना आझाद मोफत शिक्षण योजना राबवणार
* राजीव गांधी जीवनदायी योजना राज्यात राबवणार
* स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी सुकन्या योजना
* लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी १५ कोटी १० लाखांची तरतूद
* अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ
* ठेवी बुडालेल्या उपवर मुलींच्या पालकांना १ लाखांची मदत
* मुलींसाठी सुकन्या योजना राज्यात राबवणार
* अंगणवाडी सेविकांना निवृत्तीनंतर १ लाख रुपये
* राज्यात १० हजार शेततळी होईपर्यंत योजना सुरू राहणार
* शेततळ्यांना २५ हजार रुपयांचं अनुदान देणार
* घरकूल योजनेसाठी ६७५ कोटींची तरतूद
* चार महिन्यांच्या लेखानुदानास मंजुरी
* ग्रामीण, शहरी भागात रमाई घरकूल योजना
* रोजगार हमीसाठी २५० कोटींची तरतूद
* राज्याच्या दरडोई उत्पन्नात वाढ
* भांडवली खर्चासाठी २ हजार २५३ कोटी
* ७ कोटी जनतेला अन्न सुरक्षेचा फायदा
* अर्थसंकल्प २०१४-१५
* अर्थमंत्री अजित पवार य़ांनी सादर केला अर्थसंकल्प
* विधीमंडळात राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.