LIVE -निकाल दक्षिण मुंबई

प्रोफाईल मतदारसंघाचं : दक्षिण मुंबई

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 16, 2014, 09:53 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, दक्षिण मुंबई
दुपारी 1.30 वाजता अपडेट
दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत विजयी
दुपारी 12.12 वाजता अपडेट
अरविंद सावंत यांची 58192 मतांची आघाडी
दुपारी 12.12 वाजता अपडेट
शिवसेनेचे अरविंद सावंत सहाव्या फेरीअखेर आघाडीवर कायम
दुपारी 12.10 वाजता अपडेट
शिवसेनेचे अरविंद सावंत 43681 मतांनी आघाडीवर
सकाळी 11.20 वाजता अपडेट
शिवसेनेचे अरविंद सावंत पाचव्या फेरीत आघाडीवर
सकाळी 11.00 वाजता अपडेट
शिवसेनेचे अरविंद सावंत चौथ्या फेरीत घेतली आघाडी, 33428 मतांची आघाडी
सकाळी 9.00 वाजता अपडेट
शिवसेनेचे अरविंद सावंत यांची निर्णायक आघाडी
सकाळी 8.00 वाजता अपडेट
शिवसेनेचे अरविंद सावंत आघाडी

शिवेनेचे अरविंद सावंत यांची आघाडी
काँग्रेसचे विद्यमान खासदार मिलिंद देवरा यांना धक्का

मतदारसंघ : दक्षिण मुंबई
मतदान दिनांक : २४ एप्रिल
एकूण मतदान : 55 टक्के मतदान
उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – मिलिंद देवरा (काँग्रेस)
महायुती – अरविंद सावंत (शिवसेना)
मनसे – बाळा नांदगावकर
आप – मीरा सन्याल
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
मिलिंद देवरा - काँग्रेस (विजयी) - २,७२,४११ मतं – ४२.४६%
बाळा नांदगावकर - मनसे - १,५९,७२९ मतं – २४.९०%
मोहन रावले – शिवसेना – १,४६,११८ मतं – २२.७८%
मतदारांची संख्या (२००९)
एकूण : ६,४१,७०५
पुरुष : ९,०४,७३३
महिला : ६,८५,०७८
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 देवरा यांच्या विरोधात लढण्यासाठी भाजपचे मलबार हिलचे आमदार मंगलप्रभात लोढा यांनी तयारी सुरू केली होती. आपल्या मुलाला उमेदवारी मिळावण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
 मात्र युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्यानं ही संधी अरविंद सावंत यांना मिळाली.
 देवरा कुटुंबीयांचे सत्तेच्या वर्तुळात असलेले महत्त्व लक्षात घेता मिलिंद देवरा यांच्यासाठी एक बडा उद्योगपती प्रयत्नशील होता.
 मतदारसंघातील गुजराती, मारवाडी, जैन व अल्पसंख्याक मतदारांचे प्रमाण लक्षात घेता काँग्रेसचे नेते विजयासाठी आशावादी आहेत.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.