www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
16 मे रोजी निवडणुकीचे निकाल हाती येणार आहेत. मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरूवात होणार आहे, यानंतर काही वेळाने कोणता उमेदवार आघाडीवर हे ही समजण्यास सुरूवात होईल. पण ही मतमोजणी नेमकी कशी होते हे जाणून घेणे महत्वाचे आहे.
जाणून घ्या कशी होणार आहे मतमोजणी
वोटिंग मशीन्स कडेकोट बंदोबस्तात ठेवले जाणार आहेत. लोकसभा मतदार संघातील सर्व मशीन्स एकाच ठिकाणी मतमोजणीसाठी ठेवण्यात येतात.
सर्वात आधी पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी होते. पोस्टाने आलेल्या मतांची मोजणी केल्यानंतर अर्ध्यातासाने ईव्हीएम मशीनने आलेल्या मतांची मोजणी होते. मशीन्स सुरक्षित ठिकाणी बॅरिकेटेड भागात नेले जातात.
एका वेळेस जास्तच जास्त १४ ईव्हीएम मशीन्समधील मतांचीच मोजणी केली जाते, काऊंटिंग एरियात १४ टेबल लावले जातात. इलेक्शन ऑफिसर आणि पक्षाने लक्ष ठेवण्यासाठी नेमलेल्या कार्यकर्त्यांमध्ये जाळी लावली जाते, यामुळे कुणीही एव्हीएम मशीनला हात लावू शकत नाही.
काऊटिंग करणारे अधिकारी पहिल्यांदा लावलेल्या कागदी सीलची तपासणी करतात, तसेच काही छेडछाड तर करण्यात आली नाही ना, याची खात्री करतात. फॉर्म १७ सीवर उमेदवारांच्या तसेच त्यांच्या इलेक्शन एजेंटच्या सह्या घेतल्या जातात, त्यानंतर तो फॉर्म निवडणूक अधिकाऱ्याकडे सोपवला जातो.
हा फॉर्म १३ टेबलांवर फिरवला जातो, ऑफिसर यावर काऊंटिंगचे आकडे भरतात, शेवटी हा निकाल राऊंड प्रमाणे ब्लॅक ऍण्ड व्हाईट बोर्डवर प्रकाशित केला जातो. प्रत्येक राऊंडचे रिझल्टस मुख्य निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना पाठवले जातात. जो पर्यंत शेवटचा निकाल हाती येत नाही, तोपर्यंत हे आकडे पाठवले जातात.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.