लोकसभा २०१४ | महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान

मुख्य निवडणूक आयुक्त व्ही के संपत यांनी आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली.

Updated: Mar 5, 2014, 11:51 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
मुख्य निवडणूक आयुक्त व्ही के संपत यांनी आज निवडणुकांच्या तारखांची घोषणा केली.
राज्यात तीन टप्प्यात तर देशात नऊ टप्प्यात लोकसभा निवडणूक घेण्यात येणार आहे.
यात महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याचं मतदान १० एप्रिल, दुसऱ्या टप्प्यातलं १७ एप्रिल आणि तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २४ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
मतमोजणी १६ मे रोजी होईल, असं निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.
लोकसभा २०१४ | महाराष्ट्रात तीन टप्प्यात मतदान
पहिल्या टप्प्यातलं मतदान | १० एप्रिल
पहिल्या टप्पा - १० मतदार संघ
बूलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान | १७ एप्रिल
दुसरा टप्पा - १९ मतदार संघ
हिंगोली, नांदेड, परभणी, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, हातकणंगले, पुणे, मावळ, बारामती, शिरूर, शिर्डी, अहमदनगर, लातूर, बीड, उस्मानाबाद, माढा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग,
तिसऱ्या टप्प्यातलं टप्प्यातलं मतदान | २४ एप्रिल
तिसरा टप्पा - १९ मतदार संघ
मुंबई-उत्तर, मुंबई-दक्षिण-मध्य, मुंबई-उत्तर-पश्चिम, मुंबई-उत्तर-पूर्व, मुंबई-उत्तर-मध्य, ठाणे, नंदुरबार, धुळे, रावेर, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, पालघर, रायगड, भिवंडी, दिंडोरी, जालना, औरंगाबाद, कल्याण
मतमोजणी १६ मे रोजी

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.