‘बुथ कॅप्चरिंग’ प्रकरणी राहुल गांधींवर आज निर्णय

गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी अमेठीत पाऊलही न ठेवणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीच्या साहमऊ इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन थेट मतदान यंत्रापर्यंत जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: May 9, 2014, 11:09 AM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था, अमेठी
गेल्या दोन लोकसभा निवडणुकांत मतदानाच्या दिवशी अमेठीत पाऊलही न ठेवणारे काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी अमेठीच्या साहमऊ इथल्या मतदान केंद्राला भेट देऊन थेट मतदान यंत्रापर्यंत जाऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग केला. त्यांच्या या वर्तणुकीमुळं ‘बूथ कॅप्चरिंग’चा आरोप त्यांच्यावर होत आहे. राहुल यांची मतदान यंत्रासमोरची उपस्थिती सिद्ध करणारी छायाचित्रं सोशल मीडियावर प्रसिद्ध झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
मतदानावेळी मतदान यंत्राजवळ उभे असलेले राहुल दोन ठिकाणी एका इंग्रजी वृत्तपत्राच्या छायाचित्रकारानं घेतलेल्या फोटोत कैद झाले आहेत. मतदानाच्या वेळी उमेदवारानं बूथमध्ये जाऊन एखादा मतदार मतदान करत असताना त्याच्यावर दबाव आणणं बेकायदेशीर आहे, असं सांगून निवडणूक आयोगातील एक अधिकारी म्हणाला की, मतदानावेळी मतदान यंत्राजवळ फक्त तीन व्यक्ती जाऊ शकतात. एक मतदार, दुसरे निवडणूक निर्णय अधिकारी आणि तिसरे मतदान केंद्राचे प्रमुख.
मतदानावेळी उमेदवाराला मतदान केंद्रात जाण्याची मुभा आहे. तो मतदारांशी बोलूही शकतो, पण मतदाराशी बोलताना उमेदवार मत देण्यासाठी दबाव आणू करू शकत नाही’ असं या अधिकार्याूनं सांगितलं.
‘एखादा उमेदवार मतदान केंद्रात मतदान यंत्राजवळ गेलाच तर निवडणूक निर्णय अधिकारी त्याला जबाबदार असेल. मतदार मतदान करत असताना उमेदवार तिथं जाऊन हस्तक्षेप करत असल्यास लोकप्रतिनिधी कायद्यानुसार हा गुन्हा आहे’, असं तो अधिकारी म्हणाला.
याच प्रकरणी राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप आणि आम आदमी पार्टीनं निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. आज निवडणूक आयोग या आरोपांबाबत तपास करून निर्णय देणार आहे. जर राहुल गांधी या प्रकरणी दोषी आढळले तर त्यांना तीन महिन्यांची शिक्षा किंवा दंड होऊ शकतो.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.