नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार : अजित डोवाल

भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: May 31, 2014, 11:12 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचे नवे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून अजित डोवाल यांची नियुक्ती करण्यात आलीय.
गुप्तचर खात्याचे माजी प्रमुख असलेले अजित डोवाल हे आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षाविषक मुद्यांवर निर्णय घेण्यासाठी मदत करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील समितीनेच डोवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.
अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार झालेले पोलीस सेवेतील दुसरे अधिकारी ठरलेत. डोवाल हे आता भारत-चीन सीमा मुद्यावर पंतप्रधानांचे खास प्रतिनिधी म्हणून काम पाहणार आहेत.
याआधी नरेंद्र मोदींनी माजी निवृत्त सनदी अधिकारी नृपेंद्र मिश्र यांना आपले प्रधान सचिव म्हणून नेमलं. त्यानंतर आता गुप्तचर खात्याचे प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झालेल्या डोवाल यांची त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नेमणूक केलीय.
डोवाल यांनी यापूर्वी गुप्तचर खात्याचे माजी प्रमुख म्हणून काम पाहिलंय. जानेवारी 2005 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. ते 1968 च्या आयपीएस केरळ बॅचचे अधिकारी आहेत. इंदिरा गांधींकडून त्यांनी मेडल स्वीकारलं होतं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.