www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
विजयी मिरवणुका काढण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मनाई करण्यात आलीय. 18 मे नंतर मिरवणुका काढण्याची परवानगी देण्यात येईल, अशी माहिती मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी दिलीय. दरम्यान, मुंबईत एकूण चार ठिकाणी मतमोजणी होणार असून सर्वच मतमोजणी केंद्रांवर कडक बंदोबस्त लावण्यात आलाय.
16 मे ला लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर मुंबईतील विजयी उमेदवारांना विजयी मिरवणुका अथवा विजयोत्सव साजरा करता येणार नाही. मतमोजणीच्या ठिकाणी आणि इतर ठिकणी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांनी ही मनाई केली आहे.
मुंबईत एकूण चार ठिकाणी मतमोजणी होणार असून सर्वच मतमोजणी केंद्रांवर कडक बंदोबस्त लावण्यात आलाय. मुंबई पोलीसांनी या बंदोबस्तासाठी राज्य राखीव दल अश्व केंद्रीय राखीव दलाची मदत घेतली असून. यांपैकी एका दक्षिण मध्य मुंबई मतदार संघाची मतमोजणी माहिम येथील रुपारेल कॉलेजमध्ये होणार आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.