www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
गणरायाची रुपं जितकी तितके त्याचे भक्तही.. प्रत्येकजण बाप्पाची भक्ती अनोख्या पद्धतीने करतो. तुम्हाला असा अवलिया ओळख करून देत आहोत. मात्र वेळात वेळ काढून ते खास पद्धतीने कशी करतात गणेशाची आराधना.
गणरायाची मूर्ती घडवण्यात दंग झालेले ही व्यक्ती थोडी खास आहे. सध्या हे हात बाप्पाच्या मूर्तीवर अखेरचा हात फिरवण्यात बिझी असले तरी या व्यक्तीने रंगभूमी गाजवलीय. हे आहे लहूराज कांबळी. वस्त्रहरण नाटकातली त्यांची गोप्याची भूमिका गाजली.
३० वर्षाच्या नाट्यप्रवासात त्यांनी २५ व्यावसायिक नाटकातून विविध भूमिका गाजवल्या.इतकंच नाही तर मच्छिंद्र कांबळी यांच्या निधनानंतर त्यांची गाजलेली नाटकं पुन्हा रंगभूमीवर आणली.. मात्र गणेशोत्सवापूर्वी रंगभूमीवरुन ते काही काळ टाइमप्लीज घेऊन गणेशमूर्ती घडवण्याच्या व्यावसायाकडे लक्ष केंद्रीत करतात. या काळात ते कोणताही नाटकाचा दौरा करत नाही. पूर्ण वेळ बाप्पाची सुबक मूर्ती साकारण्यात घालवतात.
लहूराज कांबळी यांच्या कामात त्यांना त्यांच्या कुटुंबाची मदत लाभते. पत्नी गीतांजलीही मूर्तीकामात स्वतःला झोकून देतात.रंगभूमी गाजवणा-या या रंगकर्मीची ही बाप्पा भक्ती अनोखी म्हणावी लागेल.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.