बाप्पाची लगबग, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

सारा आसमंत बाप्पा मोरयाच्या जयघोषात न्हाऊन निघालाय. पुढील १० दिवस हा उत्साह वाढतच जाणार आहे. सा-यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Sep 9, 2013, 08:15 AM IST

www.24taas, झी मीडिया, मुंबई
चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणजे गणपती. कुणी सुखकर्ता म्हणतं तर कुणी लंबोदर. कुणी ओमकार तर कुणी भालचंद्र. बाप्पाची अनेक रुपं. भक्तांच्या हाकेला धावणारा, विघ्न दूर करणा-या गणरायाच्या आगमनाची सा-यांना प्रतीक्षा असते. आज अखेर तो क्षण आलाय. सारा आसमंत बाप्पा मोरयाच्या जयघोषात न्हाऊन निघालाय. पुढील १० दिवस हा उत्साह वाढतच जाणार आहे. सा-यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.
घरोघरी आज बाप्पाचं आगमन होणार आहे.. असं असलं तरी मुंबईत लाडक्या गणरायाच्या आगमनाला सुरुवात झालीय. रविवारी संध्याकाळपासूनच घरोघरी आणि सार्वजनिक गणेश मंडळांच्या बाप्पाचं आगमन झालंय. रविवारी रात्रीही ठिकठिकाणी गणेशोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळाला.
वाजतगाजत बाप्पाचं घरी स्वागत करण्यात आलं... गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली... घरोघरी बाप्पाचं रविवारी रात्रीच आगमन झालंय.. तर दुसरीकडे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्तीही मंडपात दाखल होतायत.. रात्री मंडळांच्या गणपतीची मिरवणूकही ठिकठिकाणी पाहायला मिळाली... अवघं वातावरण गणेशभक्तीनं न्हाऊन गेलंय.
सर्वांच्याच लाडक्या गणरायाच्या आगमनाला अवघे काही तासच उरले आहेत. आणि ज्या शहरातील गणेशोसत्वाकडे पूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण देशभराच लक्ष लागून राहिलेलं आहे अशा पुण्यनगरीमध्ये गणपतीच्या स्वागताची तयारी पूर्ण झाली आहे. मानाच्या पाचही गणपतींची सोमवारी दिमाखात मिरवणूक निघेल. आणि प्राणप्रतिष्ठा केली जाईल.
ठाण्यातही घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात वाजतगाजत बाप्पाचं आगमन झालंय.. रात्रीपासूनच बाप्पाला घरी आणण्याची लगबग पाहायला मिळाली... गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात बाप्पाचं सा-यांनी स्वागत केलं.
सेलिब्रिटी आणि कलाकारांच्या आयुष्यातही गणरायाला मानाचं स्थान आहे.. या सेलिबिटींची भक्ती वारंवार पाहायला मिळते. सारेच कलाकार गणरायाचे निस्सीम भक्त आहे. अभिनेता मोहन जोशी यांच्या घरीही बाप्पाचं वाजतगाजत आगमन झालं आहे. गणरायाच्या आगमनानं सारं वातावरण भक्तीमय झालंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
लालबागचा राजा दर्शन