साहित्य - २५० ग्रॅम कोको पावडर, १ वाटी गूळ, १ चमचा वेलची पूड, ३-४ मोठे चमचे तूप, १ वाटी भाजलेला रवा, १/२ वाटी स्किम्ड मिल्क, १ वाटी ओले खोबरे, सजावटीसाठी १/२ वाटी काजू आणि बदाम.
कृती - दूधात कोको पावडर मिसळा. त्यानंतर एका पॅनमध्ये भाजलेला रवा, ओले खोबरे, तूप, वेलची पूड एकत्र करून घट्ट होईपर्यत ढवळत राहा.
यानंतर एका प्लॅटला तेल लावा आणि चांगल्या प्रकारे प्लॅटवर तयार केलेले मिश्रण पसरवा आणि थोडा वेळ थंड होऊ द्या. थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने त्याचे बर्फीच्या आकारात त्याचे तुकडे करा.
काजू, बदाम आणि माव्याने बर्फीची सजावट करा. झाली तुमची चविष्ठ चॉकलट बर्फी तयार.