फिक्सिंगचं विदर्भ कनेक्शन

फिक्सिंगप्रकरणी आणखी तीन जणांना अटक झाली आहे. यामध्य़े एका रणजी क्रिकेटपटूंचाही समावएश आहे. मनिष गुड्डेवार हा विदर्भाचा रणजी प्लेअर आहे. आणि यामुळे फिक्सिंगचं विदर्भ कनेक्शनही समोर आलंय.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 21, 2013, 09:51 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
फिक्सिंगप्रकरणी आणखी तीन जणांना अटक झाली आहे. यामध्य़े एका रणजी क्रिकेटपटूंचाही समावएश आहे. मनिष गुड्डेवार हा विदर्भाचा रणजी प्लेअर आहे. आणि यामुळे फिक्सिंगचं विदर्भ कनेक्शनही समोर आलंय.
मनीष गुड्डेवार - विदर्भाचा माजी रणजीपटू
सुनील भाटिया - सट्टेबाज
किरण डोले - सट्टेबाज

आईपीएलमध्ये फिक्सिंगचं जाळ टाकणारे आता पोलिसांच्या जाळ्यात अडकत चाललेयत.. दिल्ली पोलिसांनी याप्रकरणी अजून तीन जणांना अटक केलीय..
यांपैकी मनिष गुड्डेवार विदर्भाकडून रणजी खेळलेला आहे...तर अटक करण्यात आलेले सुनील भाटिया आणि किरण डोले बुकी आहेत ...
मनीष गुड्डेवार फिक्सिंगमध्ये पकडण्यात आलेल्या अजित चंदेलाचा चांगला मित्र आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुडड्डेवारनं अजीत चंडेलाला सुनील भाटिया और किरन डोलेची भेट घडवून आणली होती...सुनील आणि किरण हे दोन्ही बुकी नागपूरमध्ये राहणारे आहे.

दिल्ली पोलिसांची अनेक दिवसांपासून हा तिघांवर नजर होती.... अजूनपर्यंत पोलिसांनी या तिघांनी कोणत्या मॅचमध्ये फिक्सिंग केलीय या खुलासा केलेला नाही....मात्र पोलिसांकडे या तिघांनी अजित चंडिलासोबत कोणती बातचीत झाली याचं रेकॉर्डिंग आहे...
या तिघांशिवाय अजून एका माजी रणजी प्लेअर बाबूराव यादवचं नावही समोर येतंय..रेल्वेकडून खेळलेला बाबूराव मात्र अजूनही फरार आहे...त्यामुळे स्पॉट फिक्सिंगचं कनेक्शनं महाराष्ट्रात मुंबईपाठोपाठ औरंगाबाद, नागपूर या शहरांमध्ये असल्याचं स्पष्ट झालंय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.