www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
‘आयपीएल सीझन ६’ दरम्यान उघडकीस आलेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झालाय. या नव्या खुलाशामुळे भारतीय कॅप्टन महेंद्रसिंग धोनीच्या अडचणी वाढण्याची शक्यता बळावलीय.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, बीसीसीआय अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन हा चेन्नई पर किंग्जचा कॅप्टन महेंद्र सिंग धोनी आणि कोच स्टीफन फ्लेमिंग यांच्याकडून माहिती घेऊन तीच माहिती सट्टेबाजांपर्यंत पोहचवण्याचं काम करत होता. महत्त्वाचं म्हणजे, टीमच्या रणनीतीबाबत ही माहिती असायची.
मंगळवारी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी दौऱ्यावर निघण्याआधी धोनीनं पत्रकारांशी संवाद साधला होता. परंतू यावेळी स्पॉट फिक्सिंग बाबतीत विचारल्या गेलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर त्यानं दिलं नव्हतं.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.