फिक्सर खेळाडूंची गजाआड जाण्याची शक्यता नाही

एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला सध्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र फिक्सिंगबाबत भारतात सक्षम कायद्याच नसल्याने ते गजाआड जाण्याची शक्यता कमी असल्याच मत तज्ञ्ज व्यक्त करताहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: May 22, 2013, 06:55 PM IST

www.24taas.com,झी मीडिया, मुंबई
एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला सध्या स्पॉट फिक्सिंगप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र फिक्सिंगबाबत भारतात सक्षम कायद्याच नसल्याने ते गजाआड जाण्याची शक्यता कमी असल्याच मत तज्ञ्ज व्यक्त करताहेत. दरम्यान मग या क्रिकेटपटूंवर लावण्यात आलेले कलम कोणते आणि ते कसे लावण्यात आले याबाबतचा हा रिपोर्ट...
स्पॉट फिक्सिंगप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन क्रिकेटपटूंना आता गजाआड जाव लागणार की ते सहिसलामात सुटणार याकडेच आता सा-यांच लक्ष लागून राहिलय. स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अडकलेल्या एस. श्रीशांत, अंकित चव्हाण आणि अजित चंडिला या तिघांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मात्र या कलमांतर्गत त्यांना खरच शिक्षा होईल का हा कळीचा मुद्दा आहे. कारण क्रिकेट फिक्सिंगबाबत भारतात सक्षम कायदाच नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
एस. श्रीशांत, अंकीत चव्हाण आणि अजित चंडिला या तिघांवरही पोलिसांनी ४२० कलम म्हणजे फसवणूक आणि 120 बी कलम म्हणजे गुन्हेगारी षडयंत्र ही दोन कलम लावली आहेत. तर श्रीशांतवर 409 कलम म्हणजे विश्वासघाताचा कलमही लावलाय.

दरम्यान, भारतात कौशल्याचा खेळ असल्यास त्या खेळावर सट्टा लावल्यास गुन्हा ठरत नाही आणि क्रिकेट हा कौशल्याचा खेळ मानला जातो. म्हणूनच हे तिघेही क्रिकेटपटू सहिसलामत सुटण्याचीच शक्यता अधिक आहे.
कायद्याच्यादृष्टीने क्रिकेटपटूने केलेले स्पॉट फिक्सिंग हे गुन्हेगारी कृत्य ठरो किंवा ना ठरो, मात्र ज्या कोट्यावधी क्रिकेटप्रेमींचा खेळाडूंनी केलेला विश्वासघात हा मात्र मोठ गुन्हा आहे, त्याची नेमकी शिक्षा हा क्रिकेटर्सना काय मिळते, ते पहायचं.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.