www.24taas.com,कोल्हापूर
ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं पुकारलेल्या आंदोलनानंतर बंद ठेवण्यात आलेली पश्चिम महाराष्ट्रातली एसटी सेवा आज सुरु करण्यात आली.
आंदोलनाच्या काळात आंदोलकांकडून एसटीच्या बसेसना सर्वाधिक लक्ष करण्यात आल होतं. त्यामुळं सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या भागातली एसटी सेवा बंद ठेवण्यात आली होती. ऊसदराचं आंदोलन शांत झाल्यानंतर ही सेवा आता सुरू करण्यात आलीये. ज्या ठिकाणी आंदोलन तीव्र होतं त्या ठिकाणच्या वातावरणाचा अंदाज घेऊन बसेस सुरु करण्यात येणार आहेत.
सोलापूरहून सातारा सांगली आणि कोल्हापूरकडे बसेस सोडण्यात आल्यात. तर सांगली आणि कोल्हापुरातून सातारा पुणे मुंबईकडे बस सोडण्यात येतात. आंदोलनाच्या काळात अडकलेल्या एसटीच्या शेकडो प्रवाशांना यामुळं दिलासा मिळालाय. शिवाय खासगी प्रवासी वाहतूक करणा-यांकडून होणारी लूटही यामुळं थांबणार आहे. त्यामुळे एसटीच्या लाखो प्रवाशांना यामुळं दिलासा मिळालाय.