विराट- अनुष्काची छोटीसी लव्ह स्टोरी

विराट आणि अनुष्का यांच्यातील लव्ह गेम ब-याच काळापासून सुरु आहे. ही बाब जगाला माहिती आहे. मात्र, दोघांनीही यावर गप्प राहणचं पसंत केलं होतं. अस असलं तरी,  कॉमेडी शो आणि इतर शोजमध्ये या दोघांना छेडलं असतं त्यांच्या चेह-यावरील स्मित हास्य बरचं काही सांगून जातं होतं. शोचे होस्टही त्यांना अनेकवेळा यावरुनचं छेडतांना दिसले. 

Updated: Nov 21, 2014, 02:30 PM IST
विराट- अनुष्काची छोटीसी लव्ह स्टोरी title=

मुंबई : विराट आणि अनुष्का यांच्यातील लव्ह गेम ब-याच काळापासून सुरु आहे. ही बाब जगाला माहिती आहे. मात्र, दोघांनीही यावर गप्प राहणचं पसंत केलं होतं. अस असलं तरी,  कॉमेडी शो आणि इतर शोजमध्ये या दोघांना छेडलं असतं त्यांच्या चेह-यावरील स्मित हास्य बरचं काही सांगून जातं होतं. शोचे होस्टही त्यांना अनेकवेळा यावरुनचं छेडतांना दिसले. 
 
अनुष्काचं नाव समोर आल्यावर विराटच्या चेह-यावरील स्मित हास्य उमटले आणि तो चक्क लाजला. साडीच्या पदरात त्यांने तोंड लपविले. तर अनुष्काला अभिनेता आमिर खानने छेडले असता, हा रंगमंचावर हा प्रश्न नको, असे सांगून वेळ निभावून नेली. 

आणि विराटचं नाव आल्यावर हलकीशी अनुष्का लाजते. दोघांनीही खुल्लम-खुल्ला आप्ल्या प्रेमाची कबुली दिली नसली तरी, त्यांचा हा अंदाज बरचं काही सांगून जातो. त्यामुळेच तर विराटच्या ओठांवर कायम एकच गाणं असतं.  विराट आणि अनुष्काच्या ही छोटीसी लव्ह स्टोरी सध्या चांगलीच चर्चेत आहे. 

कधी शाहरुख, कधी आमिर तर कधी कॉमेडी किंग कपिल शर्मा सारेचजण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा या दोघांना एकमेकांच्या नावावरुन छेडत असतात. सर्वप्रथम कॉफी विथ करन या शो-मध्ये अनुष्काच्या चेह-यावरची लाली बरीच काही सांगून गेली. त्यानंतर किंग खाननं तर विराटचं स्वयंवर करत अनुष्काला विराटची ड्रीम गर्ल असल्याचं म्हटलं होतं. 

कॉमेडी नाईट्समध्ये जेव्हा विराट आला. त्यावेळी कपिलपासून ते दादीपर्यंत अशा प्रत्येकानं विराटला छेडलं. त्याचप्रमाणे अनुष्का जेव्हा आपला आगामी चित्रपट पीकेच्या प्रमोशनसाठी पोहोचली त्यावेळी तिला मीडियाबरोबरच आमिर खाननही विराटच्या प्रश्नावरुन भंडावून सोडलं. यावरुनच विराट आणि अनुष्काची ही लव्ह स्टोरी सुपरहिट आहे असंच म्हणाव लागेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.