आत्मघात

देशभरात निराशेमुळे एक भयंकर चित्र निर्माण झालं आहे...दर तासाला १५ लोक आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतात... नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आक़डेवारीवर नजर टाकल्यास तुम्हाला या भीषण संकटाची जाणीव होईल.. आणि सर्वात महत्वाच म्हणजे महाराष्ट्रतही परिस्थिती काही वेगळी नाही.....

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 9, 2012, 11:56 PM IST

www.24taas.com, मुंबई
देशभरात निराशेमुळे एक भयंकर चित्र निर्माण झालं आहे...दर तासाला १५ लोक आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतात... नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आक़डेवारीवर नजर टाकल्यास तुम्हाला या भीषण संकटाची जाणीव होईल.. आणि सर्वात महत्वाच म्हणजे महाराष्ट्रतही परिस्थिती काही वेगळी नाही.....
अलिकडच्या काळात आत्महत्या हा एक गंभीर प्रश्न बनत चालला आहे....विशेषतः महानगरांमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे. गेल्या वर्षभरातील आत्महत्येच्या घटनांवर नजर टाकल्यास तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
भारतात २०११मध्ये सव्वा लाखाहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. २०११ मध्ये १३,४,५९९ लोकांनी आत्महत्या केली. आत्महत्येमध्ये महानगरं सर्वात पुढं आहेत...हायटेक सीटी म्हणून ख्याती मिळवलेल्या बंगळूरु शहरात देशात सर्वाधिक आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. आत्महत्येमध्ये चेन्नई हे शहर दुस-या क्रमांवर आहे. देशाची राजधानी दिल्लीही आत्महत्येच्या घटना घडल्या आहे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही वर्षभरात मोठ्याप्रमाणात आत्महत्येच्या घटना घडल्या आहेत. देशापातळीवर राज्यांची तुलना केल्यास तामिळनाडूत आत्महत्येच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. तामीळनाडूत सर्वाधिक १६५६१ आत्महत्येची नोंद झाली आहे. तर आत्महत्य़ेत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात १५९१६ आत्महत्येची नोंद आहे. ही सगळी आकडेवरी पहाता विविध कारणातून आत्महत्या करणा-यांची संख्या किती मोठी आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल.
आज भारतातील तरुण-तरुणींमध्ये आत्महत्येचं प्रमाण वाढत चाललंय..दर ९० मिनिटाला एक तरुण किंवा तरुणी आत्महत्येचा प्रयत्न करते.. जगभरातील एकूण आत्महत्येच्या १० टक्के आत्महत्या या एकट्या भारतात होतात..यावरुन भारतातील आत्महत्येची समस्या किती गंभीर बनत चाललीय याचा अंदाज तुम्हाला आला असेल..
अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे माणूस आत्महत्ये सारखा टोकाचा निर्णय घेतो ? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.. खरंतर प्रत्येकाच्या आय़ुष्यात चढ उतार येतात..पण त्याचा सामान करण्याऐवजी काहीजण पराभव मान्य करतात..जगण्याची उमेद निघून जाते आणि ते आपली जीवनयात्री संपवतात. महानगरातील ही रंगीबेरंगी दुनिया तरुण पिढीला नेहमीच आकर्षित करत आली आहे...पण या चमचमत्या दुनियेमागे मृत्यूचा काळाकुट्ट अंधार दडला असून तो हळूहळू अनेकांचं आयुष्य़ गिळंकृत करत आहे.
अनेक कारणांमुळे लोक जीवन संपविण्यासारखा टोकाचा निर्णय घेतात...सरकारी आकडेवारीनुसार कौटुंबीक कारणामुळे आत्महत्या करणा-यांची संख्या सर्वात अधिक आहे.
कौटुंबीक कलहातून २४ टक्के लोकांनी आत्महत्या केली. २१ लोकांनी आजारपणाला कंटाळून मृत्यूला कवटाळलं. तरुण पिढीही जीवनाऐवजी मृत्यूला कवटाळण्यात मागे नाहीत. आंध्रप्रदेशात आत्महत्या केलेल्यांपैकी ७० टक्के तरुणांनी अभ्यासाला कंटाळून किंवा प्रेमात अपयश आल्यामुळं आत्महत्या केली.

एकाकीपणामुळे आत्महत्या करणा-यांची संख्याही मोठी आहे..आज समाजात वेगाने बदल होत आहे...एकत्र कुटुंब पद्धत जाऊन विभक्त कुटुंब पद्धती जोपासली जात आहे..त्यामुळे एकाकीपणा वाढत चालला आहे..घरात माणसांची संख्या कमी झाल्यामुळे हा प्रश्न भेडसावू लागला आहे...एकेकीपणाबरोबरच नोकरीमधील कामाचा ताणतणाव जीवघेणा ठरु लागला आहे...आर्थिक चणचण हे ही आत्महत्येच्या अनेक कराणापैकी एक कारण ठरु लागलं आहे..

नैराश्य केवळ सामान्य लोकांनाच नाही तर सेलिब्रीटिंनाही ग्रासतंय...आणि त्यामुळेच आजवर अनेक सेलिब्रटींनी आत्महत्ये सारखा आत्मघाती निर्णय घेऊन आपली जीवन यात्री संपवलीय...कोण आहेत त्या सेलिब्रीटी त्यावर एक नजर..

80च्या दशकात परीवन बाबीने रुपेरी पडदा गाजवला होता...त्या काळातील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिची गणना केली जात असे..१९७० ते ८० या दहा वर्षात परवीन बाबीने दिवार , नमक हलाल, अमर अकबर एन्थोनी आणि शान असे एकापेक्षा एक हिट सिनेमे दिले....बॉलीवूडमध्ये तिनं मोठं यश मिळवलं होतं..
पैसा आणि प्रसिद्धी जणू तिच्या घरी पाणी भरत होती....पण आयुष्याच्या उत्तरार्धात काही वेगळ्याच प्रसंगातून तिला जावं लागलं..२२ जानेवरी २००५ला परवीन बाबी आपल्या घरात मृत अवस्थेत आढळून आली....मृत्यूपूर्वी दोन ते तीन दिवस आधी तिने काहीच खाल्ल नसल्याचं शवविच्छेदन अहवालातून उघड झालं...पोटात अन्न नसल्यामुळे मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता...
मॉडेलिंग क्षेत्रातील एकेकाळची आघाडी मॉडेल विवेका बाबाजीनेही टोकाचा निर्णय घेतला होता..विवेकाने जाहिरातींसाठी मॉ