‘लव शव ते चिकन खुराना’ला कॉमेडीची चविष्ट फोडणी!

दिग्दर्शक समीर शर्माचा ‘लव शव ते चिकन खुराना’ चित्रपटाचा विषय तसं पाहायला गेलं तर फार वेगळा आहे. या चित्रपटाची कहाणी चक्क खाद्य पदार्थावर केंद्रीत करण्यात आलीय. चित्रपटात असलेले वृद्ध गृहस्थ खुराना, एकेकाळी स्वतःचा ढाबा चालवत होते. खुरानाच्या ढाब्यावर एक विशिष्ट प्रकारची ‘चिकन करी’ खायला मिळायची. आणि ही चिकन करी खुद्द खुराना बनवत असतं.

Updated: Nov 3, 2012, 05:57 PM IST

www.24taas.com,मुंबई
दिग्दर्शक समीर शर्माचा ‘लव शव ते चिकन खुराना’ चित्रपटाचा विषय तसं पाहायला गेलं तर फार वेगळा आहे. या चित्रपटाची कहाणी चक्क खाद्य पदार्थावर केंद्रीत करण्यात आलीय. चित्रपटात असलेले वृद्ध गृहस्थ खुराना, एकेकाळी स्वतःचा ढाबा चालवत होते. खुरानाच्या ढाब्यावर एक विशिष्ट प्रकारची ‘चिकन करी’ खायला मिळायची. आणि ही चिकन करी खुद्द खुराना बनवत असतं. काही काळानंतर ढाबा बंद पडतो आणि सगळे चिकन करीसाठी वेडे होतात. वृद्धावस्थेत असलेले खुरानादेखील चिकन करीची कृती विसरतात.
चित्रपटाच्या फ्लॅशबॅकमध्ये दाखवण्यात आलं आहे की खुराना चिकन करी बनवत असताना त्यांच्या हातून चिकनमध्ये दुर्मिळ चूर्ण पडत आणि हे खुराना त्यांच्या बायकोला सांगतात. या चूर्णामुळे चिकन करी स्वादिष्ट होते. दूरदर्शनवर १९८४ साली प्रदर्शित झालेल्या ‘हम लोग’ या सिरियलमध्ये काम केलेल्या विनोद नागपाल यांनी खुरानाची भूमिका केली आहे.
दिग्दर्शक समीर शर्मांचा हा पहिलाच चित्रपट. सुदैवाने त्यांना चांगली स्क्रिप्ट मिळाली. सुमित भटेजांनी चित्रपटाची पटकथा अप्रतिम लिहिली आहे. पंजाबमधील गावातील कहाणी या चित्रपटात साकारण्यात आलीय.
सगळे लोकं चिकन खुरानाच्या पाठी का लागले आहेत, याबद्दल चित्रपटाचा हिरो ओमी (कुणाल कपूर) सुद्धा विचार करतो. त्यालाही चिकनचं रहस्य कळतं. चित्रपटात ओमी एक नंबरचा ठग दाखवला आहे. ओमी फक्त पैशांचा भूकेला असतो. पैसे कमावण्यासाठी तो चिकन खुरानाच्या रेसिपीचा शोध घेण्यास सुरूवात करतो. चित्रपटामध्ये ओमी-हर्मनची (हुमा कुरेशी) थोडीफार लव्ह स्टोरी दाखवण्यात आली आहे.
चित्रपटात तसं पाहयला गेलं तर तांत्रिक बाबींची फोडणी थोडीशी कमी पडली आहे पण तरीही चित्रपट आणि चित्रपटाचा विषय अगदी निराळा आहे. त्यामुळे ‘लव शव ते चिकन खुराना’ कॉमेडी चित्रपट पाहण्यासारखा आहे.