www.24taas.com, मुंबई
एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, आणि ऑनलाईन व्यवहार हे आता प्रत्येकासाठी नित्याचं आणि गरजेचं झालय.. वेळेची बचत आणि पैशाची जोखीम नसल्यानं हे ऑनलाईन व्यवहार करण प्रत्येकाला सोपं वाटू लागलय.. पण सुरक्षित समजल्या जाणा-या या पारदर्शकतेमध्येही आता नवं संकट उभ ठाकलय.. तुमच्या एटीएम कार्डवर कुणाची तरी नजर आहे.. कोण आहेत ही माणसं... परदेशात असलेल्या माणसांला तुमचा गुप्त पासवर्ड समजतो कसा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही एटीएम मशीनला किवा स्वाईप मशीनवर कार्ड स्वाईप करताना त्याचं क्लोन कस तयार करण्यात येत..
तुमचं एटीएम हे तुमच्या वॅलेटमध्ये असतं. ते तुम्ही एटीएम मशीनमध्ये स्वॅप करता आणि पैसे काढता.. किवा काहीतरी खरेदी केल्यावर ड़ेबिट कार्ड स्वाईप मारता. पण हे तुम्ही स्वाईप करताना काही क्षणासाठी बेसावध असता.. हा क्षणार्धातला बेसावधपणा तुम्हाला फार मोठ्या धोक्यात टाकू शकतो..
हा सारा प्रकार नेमका कसा झालाय. या बद्दल तुम्हालाही कुतूहल असेल.. ऑनलाईन ट्रान्झ्कशनचा हा सारा खेळ आहे.. हॅकर तुमच्या अकाऊटचा सारा डाटा ट्रान्सफर करुन घेतात आणि स्वताहा त्यात ढवळाढवळ करतात.. पण जर तुमच कार्ड तुमच्या खिशात असेल तर हे सारं होत कसं हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना.. त्याच उत्तर आहे डेबिट कार्डाचे केलं जाणारं क्लोनिंग.. हे क्लोनिंग नेमक कसं होतं जाणून घेऊया एडव्हॉकेट आणि सायबर लॉ एक्सपर्ट प्रशांत माळी यांच्याकडून तुमच्याकडे एटीम कार्ड किंवा डेबीट कार्ड असण म्हणजे तुम्हाला एक निश्चिंतपणा असतो.. कुठल्य़ाही खरेदीसाठी किंवा गरजेसाठी ही कार्ड जवळ असताना गरजेला पैसा क्षणार्धात चिरागातल्या जीनसारखा उभा राहतो. पण कधीकाळचा चिरागातला जीनचा आता राक्षस झालाय.. हा सगळा प्रकार गोंधळात टाकणारा आहे.. कारण तुमच्या बॅंक अकाऊंटमध्ये कोणी दुसराच जर ढवळाढवळ करत असेल तर सगळा प्रकार हा केवळ धक्कादायकच असू शकतो.. नाशिकमध्ये घडलेला प्रकार हा कुणाच्याही बाबतीत घडू शकतो.
असं म्हणतात की, एखाद संकट ओढवायचाच असेल तर त्यासाठी तुम्ही गुन्हाच केला पाहीजे अस काही नसतं. उलट काही वेळेला तुम्ही निरपराधत्व असणंही पुरेसं आहे.. सर्वसामान्य मध्यमवर्गीय असणा-या चंद्रशेखर कासार यांच्यावर कष्टार्जित संपत्ती हातची गमावण्याची वेळ आली होती. होय पण यानंतर आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत एक धक्कादायक वास्तव. चंद्रशेखर कासार हे नाशिकच्याच एका संगणक कंपनीत काम करतात. एम जी रोडच्या एका बॅंकेत त्याचं सेव्हींग अकाऊंट आहे. बॅंकेच्या अद्य़यावत एसमेस सव्हीसचा वापरही त्यानी सुरु केला होता. पण तीन जानेवारीला त्याना बॅंकेकडून एक एसमेस आला आणि कासार पुरते हबकून गेले.
स्वतःच्या अंकाऊटमधून कुणीतरी त्रयस्थ व्यक्ती पैसे काढतेय, हे समजल्यावर कासार यांना धक्का बसला. पण तो धक्का सहन होत नाही तोच पुढची तीन मिनीटं सुरु झालं आणखी एक थरारनाट्य.. आणि हे सारं उघड्या डोळ्यांनी पाहत होते ते चंद्रशेखर कासार.. अवघ्या तीन मिनीटात पाच मोठे ट्रान्झीक्शन हे कासार यांच्या अकाऊंचमधून झाल्याचे एसमेस कासार यांच्या मोबाईलवर येत होत.. हा सगळा प्रकार कासार गोंधळलेल्या अवस्थेत पाहत होते.. काहीतरी अघडीत घडतय हे कासार यांना जाणवत होतं.. पण कासार यांच्या खात्यात सुदैवानं फार थोडी रक्कमच शिल्लक असल्यानं त्यांना तसा फटका बसणार नव्हता.. पण खरा प्रश्न होता, कि हे सगळ नेमंक करत कोण होतं?.. याचा बँकेत शोध घेतला तेव्हा त्याच उत्तर हे सारं आर्थिक व्यवहार परदेशातून होत होतं. पण आजपर्यंत कधीही परदेशात न गेलेले कासार यांच्या अकाऊंटमध्ये चक्क खरेदी होत होती..
कासार यांच्याबाबतीत झालेल्या या घटनेनं आता सारेच ग्राहक धास्तावलेत. कारण बॅकेच्या सुरक्षितेतेवरच ग्राहक निर्धास्त असतात, आणि त्याच्यावरच आयुष्यभराची मिळकत सुरक्षित असल्यांची विश्वासावर ग्राहक आयुष्य जगत असतो.. पण जो प्रकार कासार यांच्या बाबतीत झाला तो अन्य कुणाच्याही बाबतीत होणार नाही याची कुणीच खात्री देत नाहीय. बॅकेने याबाबतीत डेबिट कार्डावरुन खरेदी केल्यानं व्यवहार कायदेशीर असल्याचा दावा केलाय.. रिझर्व्ह बॅकेंच्या कायद्यानुसार ग्राहकांचे पैसे बॅकेत सुरक्षित ठेवणे आणि अधिकृत व्यवहार करणे हे बॅकेचे प्राथमिक कर्तव्य आहे. मात्र यात अयशस्वी ठरल्यावर बॅकेने जबाबदारी झटकल्याचंही समोर आलय.. पोलिसांनीही सुरुवातीला यात टाळाटाळ केली होती नंतर मात्र चंद्रशेखर यांची तक्रार दाखल करण्यात आलीय..
कासार यांची तक्रार रितसर दाखल झाली असली तरी अनेक प्रश्न अनुत्