www.24taas.com , झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचं `सी-१३० जे सुपर हर्क्युलस` हे बलाढ्य मालवाहू विमान जगातील सर्वांत उंचीवरील दौलत बेग ओल्डी तळावर उतरलं आणि चीनला धडकी भरली. या ` सी-१३० जे सुपर हर्क्युलस` विमानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे खराब हवामानात सुद्धा उड्डाण आणि लँडिग करू शकतं.
• रणनितीच्या दृष्टीनंही ‘सुपर हर्क्युलस`चं खास महत्त्व आहे.
• या विमानाला लँडिंग करण्यासाठी जास्त रनवेची गरज नाही.
• कोणत्याही प्रकारच्या हवामानात हे विमान उडू किंवा लँड होऊ शकतं.
• २० टन सामान उचलण्याची विमानाची क्षमता आहे.
• या विमानातून जवळपास ८० सशस्त्र जवान एकाचवेळी जावू शकतात.
• हवाई दलाचं हे सगळ्यात मोठं विमान आहे.
• उत्तराखंड प्रलयानंतर मदतीच्या वेळी या विमानानं महत्त्वाची भूमिका बजावली.
`सी-१३० जे सुपर हर्क्युलस`च्या उपस्थितीमुळं आता सीमारेषेवर मोठ्या संख्येनं जवानांना नेता-आणता येणार आहे. शिवाय त्यांना पहिले पेक्षा जास्त प्रमाणात रसदही पुरवता येईल. लद्दाकमध्ये सध्या तैनात असलेल्या जवांनाचं मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘सुपर हर्क्युलस`ची सीमारेषेजवळील उपस्थिती महत्त्वाची ठरेल.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.