‘आकाश’ टॅबचं भविष्य अधांतरी!

आकाश टॅबलेटचे मोठा गाजावाज करून लाँचिंग केल्यानंतर आता केंद्र सरकारने जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट बनविणाऱ्या डाटाविंड या कंपनीशी पुढील काळात होणारा व्यवहार अधांतरीत ठेवला आहे. या कंपनीचे पुढील कॉन्ट्रक्ट एक्सटेंड करण्याबाबत सरकारने नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

Updated: Jan 13, 2012, 05:03 PM IST

www.24taas.com, नवी दिल्ली

आकाश टॅबलेटचे मोठा  गाजावाज करून  लाँचिंग केल्यानंतर आता केंद्र सरकारने जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट बनविणाऱ्या डाटाविंड या कंपनीशी पुढील काळात होणारा व्यवहार अधांतरीत ठेवला आहे. या कंपनीचे पुढील कॉन्ट्रक्ट एक्सटेंड करण्याबाबत सरकारने नकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

 

 

आकाश या टॅबलेटमध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे मनुष्यबळ विकास मंत्रालय डाटाविंडशी पुढील करार करण्यास उत्सुक नसल्याची माहिती झी २४ तासला मिळाली आहे. आकाश मध्ये असलेल्या त्रुटींमुळे अनेक ग्राहकांनी याला नापसंती दर्शवली आहे.

या खेरीज सरकार डाटाविंडचे कॉन्ट्रक्ट इतर कंपनीला देण्याचा सरकार विचार करीत आहे.

 

आकाश अयशस्वी होण्याच्या दहा गोष्टी 

1) खराब प्रोसेसरमुळे टॅब अनेक प्रकारची कार्य पूर्ण क्षमतेने करु शकणार नाही. एण्ड्रोईड ओएस ऍप्लिकेशनला पुरेशी मेमरी असल्याशिवाय ऍप्लिकेशन्स आणि ग्राफिक्सचा वापर करता येणार नाही. बाजारात सध्या सगळ्यात स्वस्तात उपलब्ध असलेलेल स्पाईस कंपनीचे ऍण्ड्रोईड मोबाईल्स ६०० मेगाहर्ट्झ प्रोसेसरवर चालतात तर आकाशमध्ये फ्कत ३३६ मेगाहर्टझचा प्रोसेसर बसवण्यात आला आहे. त्यामुळे त्याचा उपयोग फक्त ओएससाठी होऊ शकेल आणि एकावेळी अनेक ऍप्लिकेशन वापरता येणार नाहीत, असं मत या क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केलं आहे.

 

२)आकाश टॅबलेट हेवी म्हणजेच जड फाईल्स आणि भरपूर गाणी साठवू शकणार नाही.  त्यात व्हिडीओ साठवण्याची क्षमता कमी आहे. टॅबलेटच्या मेमरीचा विस्तार ३२ जीबी पर्यंत करता येणार असला तरी त्यासाठी ८ जीबीच्या मायक्रोएसडीला जास्त पैसे मोजावे लागतील. या कार्डची किंमत ८०० ते १००० रुपयांच्या दरम्यान आहे आणि त्यामुळे सरकारने निश्चित केलेल्या २५०० रुपयांपेक्षा जास्त पैसे ग्राहकाला खर्च करावे लागतील.

 

३ )आकाशला शक्तीशाली बॅटरीचा बॅकअप देण्यात आलेला नसल्याचं तज्ञांचे म्हणणं आहे. आकाश सारख्या तुलनेने मोठं स्क्रीन असलेल्या गॅझेटला जास्त काळ चालणाऱ्या बॅटरीची गरज आहे. बाजारात स्वस्तात उपलब्ध असलेल्या ऍण्ड्रोईड फोनमध्ये  १५०० एमएएच बॅटरी बसवण्यात आली आहे. या फोनचा स्क्रीन फक्त ३ ते ३.५ इंच इतका आहे. आकाशची निर्मिती करणाऱ्या डाटाविंडने १८० मिनिटांचा पॉवर बॅकअप असल्याचा दावा केला असला तरी त्याचा कशासाठी उपयोग होऊ शकेल याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. टॅबमधील कमी क्षमतेच्या प्रोसेसरमुळे वेब ब्राऊझिंगचा वेग मंदावेल तसंच बॅटरी जास्तीत जास्त तीन तासच चालू शकेल.

 

४) आकाश टॅबलेटचं स्क्रीन रेझोल्युशन कमी दर्जाचं आहे आणि त्यात हाय डेफिनिशन आऊटपूट नाही. त्यामुळे टॅबलेटचा उपयोग बंदिस्त जागेतच करता येईल आणि सूर्यप्रकाशात करता येणार नाही. आकाशच्या टचस्क्रीनचं फिचरही वापरण्यास सहज सुलभ नाही आणि त्यामुळे आयकॉन तसंच इतर ऍप्लिकेशनचं ब्राऊझिंग करणं अडचणीचं ठरेल.

५) आकाशचा प्रोसेसर कमी क्षमतेचा असल्याने मल्टी टास्किंगला लागणाऱ्या वेगामुळे त्यावर ताण पडू शकतो आणि तो लवकर गरम होऊ शकतो. टॅबलेट एक तास सातत्याने वापरल्यास तो तापतो असा अनुभव वाय फाय तसंच वेब बाऊझिंग करणाऱ्यांना आला आहे.

 

६) आकाशला ब्ल्युटूथ सपोर्ट देण्यात आलेला नाही. 

७) आकाशमध्ये ऍण्ड्रोईड ऍप्लिकेशन नसल्याने त्यात मर्यादित ऍप्लिकेशन्सचा वापर करता येणार आहे. त्यामुळे ते स्वतंत्रपणे बसवावं लागेल. पण टॅबचा टार्गेट ग्राहक हा ग्रामीण भागातला असल्याने त्याला ऍन्ड्रॉईडचं फारसं ज्ञान असण्याची शक्यता नाही.

 

८) आकाशमधल्या हार्डवेअरची क्षमता कमी असल्याने त्यात अपग्रेड करणं कठीण होईल.

 

९) आकाश टॅबलेटला वाय फायचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला असला तरी ग्रामीण भागातील खराब कनेक्शन हा मोठा अडथळा ठरेल. देशातील महत्वाच्या महानगरांमध्येही सर्व्हिस कंपन्या वाय फाय नेटवर्कची सेवा चांगल्या प्रकारे पुरवू शकत नाही. तिथे ग्रामीण भागातल्या परिस्थितीची कल्पना केलेली बरी.  

 

१०) आकाश टॅबलेटला स्पीकर्सची जोडणी देण्यात आलेली नाही. त्यामुळे ऑडिओसाठी इअरफोनची आवश्यकता भासेल आणि त्यासाठी अधिक पैसे मोजावे लागतील