पानिपत : न उलगडलेल्या घटनांवर प्रकाश

ठाण्याच्या संजय क्षीरसागर या तरुणानं पानिपतच्या युद्धावर संदर्भग्रंथ लिहिलाय. यामध्ये पानिपतच्या आजपर्यंतच्या न उलगडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आलाय. विशेष म्हणजे दोन्ही पाय निकामी झालेले असतानाही संजय क्षीरसागरनं ही किमया केलीय.काय आहे रिपोर्ट.

Updated: May 15, 2012, 10:50 AM IST

www.24taas.com, ठाणे

ठाण्याच्या संजय क्षीरसागर या तरुणानं पानिपतच्या युद्धावर  संदर्भग्रंथ लिहिलाय. यामध्ये पानिपतच्या आजपर्यंतच्या न उलगडलेल्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आलाय. विशेष म्हणजे दोन्ही पाय निकामी झालेले असतानाही संजय क्षीरसागरनं ही किमया केलीय.काय आहे रिपोर्ट.

ठाण्याच्या लुईसवाडीतला संजय क्षीरसागर. अक्रीनी या आजारानं पीडित असलेल्या संजयचे दोन्ही पाय निकामी झालेत. आजारनं खचून न जाता  धष्टपुष्ट लोकांना लाजवेल अशी कामगिरी संजयनं केलीय. 'पानिपत असे घडले' हा संदर्भग्रंथ त्यानं लिहिला आहे. १९६१  मध्ये शेजवलकरांनी पानिपतवर संदर्भग्रंथ लिहीला होता. त्यानंतर तब्बल ५० वर्षांनी पानिपतवर  संदर्भग्रंथ लिहिण्यात आलाय. शेजवलकरांनी न लिहिलेल्या अनेक बाबी या ग्रंथामध्ये आहेत. शिंदे होळकरांनी अब्दालीशी केलेला तह नानासाहेब पेशव्यांनी मान्य केला असता तर पानिपत झालचं नसतं असं संजय सांगतो.

पानिपतवर मराठी सैनिकांची उपासमार झालीच नाही असंही तो सांगतो. युद्धाच्या दिवशी मराठी सैन्याचा रोख आग्नेय दिशेला होता हा शेजवलकरांचा मुद्दाही संजय खोडून काढतो. या पुस्तकाच्या रुपानं संजयनं पानिपतचा आजपर्यंत माहित नसलेला इतिहास पुढे आणला आहेच. त्याशिवाय जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर  कोणतीही गोष्ट अशक्य नाही हेही त्यानं दाखवून दिलंय. हे पुस्तक इतिहास प्रेमींसाठी एक पर्वणी आहे. तर संजयची कामगिरी विविध आजारांनी ग्रस्त असेलेल्या आणि आत्मविश्वास हरवून बसलेल्यांसाठी प्रेरणादाई आहे.