नवी मुंबईत फुलपाखरांसाठी घरकुल

नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शहरात फुलपाखरु उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीतल्या सेक्टर एक आणि सेक्टर सहापर्यंत हे उद्यान उभारण्यात येतयं. या भागात असलेल्या नऊशे मिटरच्या जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी हे बटरफ्लाय गार्डन उभारण्याची संकल्पना आहे.

Updated: Feb 1, 2012, 04:12 PM IST

www.24taas.com, , नवी मुंबई

 

नवी मुंबई महापालिका प्रशासनानं शहरात फुलपाखरु उद्यान उभारण्याचा निर्णय घेतला आहे. वाशीतल्या सेक्टर एक आणि सेक्टर सहापर्यंत हे उद्यान उभारण्यात येतयं. या भागात असलेल्या नऊशे मिटरच्या जॉगिंग ट्रॅकच्या शेजारी हे बटरफ्लाय गार्डन उभारण्याची संकल्पना आहे. यासाठी सुमारे चार कोटींची तरतूद करण्यात आलीये.

 

या उद्यानात फुलपाखरांची उत्पत्ती करण्यात येणार आहे. उद्यानात देशी आणि विदेशी प्रजातींची फुलपाखरं पहायला मिळतील असा दावा महापौर सागर नाईक यांनी केला आहे. फुलपाखरांच्या प्रजोत्पादनासाठी खास तीन प्रकारची झाडंही लावण्यात येणार आहे.