परदेशात शिकायचंय; करा ‘टफेल’ची तयारी

`टफेल` म्हणजेच ‘टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज अॅन फॉरेन लॅग्वेज’… आता केवळ अमेरिकेत स्टडी करण्यासाठीच नाही तर इतर देशांतील युनिव्हर्सिटीमध्येही प्रवेश मिळण्याकरता तुम्हाला टफेलची पायरी ओलांडूनच प्रवेश करता येतो.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Jul 31, 2013, 08:12 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
`टफेल` म्हणजेच ‘टेस्ट ऑफ इंग्लिश अॅज अ फॉरेन लॅग्वेज’… आता केवळ अमेरिकेत स्टडी करण्यासाठीच नाही तर इतर देशांतील युनिव्हर्सिटीमध्येही प्रवेश मिळण्याकरता तुम्हाला टफेलची पायरी ओलांडूनच प्रवेश करता येतो. हावर्ड, ऑक्सफर्ड, मॅकगिल, ईटीएच, ज्युरिश, ऑस्ट्रेलियन नॅशनल युनि‍व्हर्सिटी आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरसह जवळजवळ सहा हजार युनिव्हर्सिटींनी `टफेल`ला मान्यता दिलीय.
टफेलच्या ऑनलाईन परीक्षा चार भागांत विभागलेली असते
रीडिंग:
या सेक्शनमध्ये तीन ते पाच लांब पॅसेज आणि यावर आधारित प्रश्न दिले जातात. हे पॅसेज अंडरग्रॅज्युएट सिलॅबसमधून घेतले जातात आणि यात बघितले जाते की, स्टुडंट्सज टॉपिक, पॅसेज, आयडिया, वॉकेब्ज आणि इतर मुद्यांवर किती सक्षम आहे ते. यात इंटरनेट बेस टेस्टमध्ये तीन पॅसेज आणि ३९ प्रश्न ६० मिनिटांत सोडवायचे असतात.
लिसनिंग:
या सेक्शन अंतर्गत सुडंट्स सहा पॅसेजला खूप गांभिर्याने ऐकतो. त्यानंतर चार अॅेकॅडमिक पॅसेजबरोबर दोन स्टुडंटस्मध्ये चर्चा केली जाते. लिसनिंग सेक्शनमध्ये स्टुडंट्सिला पॅसेजमधील आयडिया, डिटेल्सवर विशेष लक्ष द्यावं लागतं. यातील इंटरनेट बेस टेस्टमध्ये सहा पॅसेज आणि ३४ प्रश्न ५० मिनिटांत सोडवायचे असतात.
स्पिकिंग:
या सेक्शन अंतर्गत टॉस्क ‍‍दिले जातात. ज्यात दोन टास्क स्वतंत्रपणे करण्यासाठी दिले जातात. पण सर्व टास्क सामूहिकच असतात. यात स्टुडंट्स् पॅसेज वाचतो तर दुसरा त्याला लक्ष देवून ऐकतो. मग दोघेही त्यातील फरक स्पष्ट करून त्याची व्याख्या तयार करतात. यासाठी घेण्यात येणार्या इंटरनेट बेस टेस्टमध्ये सहा टास्क आणि सहा प्रश्न २० मिनिटांत सोडवायचे असतात.

रायटिंग:
या सेक्शनमध्ये दोन टास्क दिले जातात. यात एक टास्क स्वतंत्ररित्या तर दुसरा सामूहिकपणे करायचा असतो. यात स्टुडंट्से ऐक पॅसेज वाचतो आणि दुसरा ते ऐकतो. मग, दोघेही तो पॅसेजमधील संबंध स्पष्ट करून आपले विचार मांडतात. शेवटी यातील इंटरनेट बेस टेस्टमध्ये दोन टास्क आणि दोन प्रश्न ५५ मिनिटांत सोडवायचे असतात.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.