www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ कोणीही हॅक केलेले नाही. तर भारतीय छात्र संसदची विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील हायपर लिंक हॅक झाल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ पाकिस्तानी ब्लेझिंग हॅकर्स यांनी हॅक केल्याचे रविवारी रात्री उघडकीस आले. मात्र, पाकिस्तानच्या ब्लेझिंग हॅकर्सने हॅक केल्याचे वृत्त मुंबई विद्यापीठाने सोमवारी फेटाळले आहे. राजकारणाचे धडे देणार्या भारतीय छात्र संसदची विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील हायपर लिंक हॅक झाल्याचे विद्यापीठाकडून स्पष्ट कऱण्यात आले आहे.
या हॅकर्सने राजकारणाचे धडे देणार्या भारतीय छात्र संसदचे संकेतस्थळ हॅक करत भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना धमकी दिली आहे. पाकिस्तानचे तुम्ही काहीच बिघडवू शकत नाही, असे हॅकर्सनी संदेशात मोदी यांना उद्देशून म्हटले होते. सहा महिन्यांमध्ये पाकिस्तानचे नामोनिशाण मिटवून पाकिस्तानमध्ये गुप्त मोहीम राबविणार असल्याचे ऐकले आहे. पण मोदीजी प्रथम तुम्ही स्वत:ला सुरक्षित करा, असा इशारा या संदेशात देण्यात आला होता.
हा प्रकार विद्यापीठ प्रशासनाच्या लक्षात येताच त्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावरील लिंक तातडीने डीलीट केली आहे. याबाबतचा अहवाल मुंबई विद्यापीठाच्या संगणक विभागाचे प्रमुख मोहन कुमार यांनी सोमवारी प्र -कुलगुरू नरेश चंद्र यांना सादर केला. मुंबई विद्यापीठाचे संकेतस्थळ सुरक्षित असून, संकेतस्थळावरील भारतीय छात्र संसदची हायपर लिंक हॅक झाली आहे. हा प्रकार लक्षात येताच विद्यापीठाने ही हायपर लिंक डीलीट केल्याचे सांगितले.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.