सीईटीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा

सीईटीचा निकाल जाहीर झालाय. मेडिकल सामायिक प्रवेश परीक्षेसाठी १७ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

Updated: Jun 1, 2016, 08:18 AM IST
सीईटीचा निकाल जाहीर, निकाल पाहण्यासाठी इथं क्लिक करा title=

मुंबई : सीईटीचा निकाल जाहीर झालाय. मेडिकल सामायिक प्रवेश परीक्षेसाठी १७ टक्केच विद्यार्थी उत्तीर्ण झालेत.

सीईटी ही परीक्षा वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच औषधशास्त्र अभ्यासक्रम प्रवेशासाठी घेण्यात येते. राज्य सामायिक परीक्षेचा निकाल मंगळवारी रात्री उशिरा जाहीर करण्यात आला. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) केवळ विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केलेत.

परीक्षेत कुठल्या विभागात किती निकाल लागला, याची घोषणा करण्यात आलेली नाही. विदर्भातून ५८ हजार ३७० परीक्षार्थींपैकी १२ हजार २०३, मराठवाड्यातून ५५ हजार ३४ विद्यार्थ्यांपैकी ११ हजार ८९४ तर उर्वरित महाराष्ट्रातून १ लाख ६२ हजार २२३ विद्यार्थ्यांपैकी २२ हजार ७०० विद्यार्थी पात्र ठरले आहेत. टक्केवारीनुसार हे प्रमाण विदर्भात २०.९१ टक्के, मराठवाड्यात २१.६१ टक्के तर उर्वरित महाराष्ट्र १३.९९ टक्के इतके आहे.
 
हा निकाल आज बुधवारी सकाळी १० वाजता डीएमईआरच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. महाविद्यालयांना विद्यार्थ्यांच्या गुणांची यादी बुधवारीच सोपविली जाईल. 

अभियांत्रिकीची मेरिट यादी २०० तर मेडिकलची मेरिट यादी १९७ गुणांपासून सुरू होण्याची शक्यता या सूत्रांनी व्यक्त केली. टॉपर कोणत्या शहरातील आहेत, हे देखील कळू शकले नाही.   

निकाल येथे पाहा : 

www.dmer.org
www.mhcet2016.co.in  
www.mahacet.org,  
www.dtemaharashtra.gov.in
या संकेतस्थळांवर निकाल पाहता येईल. 

दोन गुणांचा बोनस!

दरम्यान, ५ मे रोजी झालेल्या सीईटीच्या परीक्षेत दोन प्रश्न चुकीचे होते. हे दोन्ही प्रश्न वगळण्याचा निर्णय झाला होता. पण सीईटी सेलने नंतर दोन्ही प्रश्न पत्रिकेत कायम ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही चुकीच्या प्रश्नांचे दोन बोनस गुण देण्यात आलेत.