ICSE चा दहावीचा निकाल आज दुपारी ३ वाजता

कॉन्सिल ऑर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट अॅक्झामिनेशन बोर्डातर्फ़े घेतल्या गेलेल्या १०वीचा निकाल अखेर आज दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहे. 

Updated: May 6, 2016, 01:13 PM IST
ICSE चा दहावीचा निकाल आज दुपारी ३ वाजता title=
संग्रहित

मुंबई : कॉन्सिल ऑर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट अॅक्झामिनेशन बोर्डातर्फ़े घेतल्या गेलेल्या १०वीचा निकाल अखेर आज दुपारी ३ वाजता जाहीर होणार आहे. 

दहावीची परीक्षा २९ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान घेण्यात आली होती. या परीक्षेत ८८,२०९ विद्यार्थी आणि ७०,६२६ विद्यार्थीनींनी परीक्षा दिली. गेल्या वर्षी ९८.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. तर २०१५ च्या मे महिन्यात निकाल लागला होता.

हा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे. आज दुपारी ३ वाजता दहावी आणि बारावीचे दोन्ही निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे. 

निकाल कसा पाहाल?

१) cisce.org, cisce.org/results आणि careers.cisce.org या वेबसाईटवर दुपारी ३ वाजता लॉगिंन करा

२) त्यानंतर ICSE Class X Results 2016 यावर क्लिक करा

३) त्यानंतर आवश्यक ती माहिती भरा

४) लगेच तुमचा रिझल्ट स्क्रिनवर दिसेल. तो तुम्ही Save आणि Donwload करू शकता. आणि त्याची प्रिंट आऊट काढू शकता.

एसएमएसद्वारे असा पाहा निकाल

आपण SMS द्वारे देखील निकाल पाहू शकता. त्यासाठी ICSE – आपला सिट क्रमांक 09248082883 यावर पाठवू शकतात.