मुंबईत शिक्षण घेण्याच्या वयात मुलांच्या हाती आंदोलनाचे फलक

मुलुंडच्या शांती निकेतन शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षण घेण्याच्या वयात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलनाचे फलक हाती घेण्याची वेळ आली होती. शाळेनं अचानक शाळा बंद होत असल्याची नोटीस पालकांना दिली. मात्र 'झी मीडिया'च्या दणक्यानं आता या विद्यार्थ्यांवरचं संकट टळलंय.

Updated: Apr 9, 2015, 03:59 PM IST
मुंबईत शिक्षण घेण्याच्या वयात मुलांच्या हाती आंदोलनाचे फलक  title=
संग्रहीत

मुंबई : मुलुंडच्या शांती निकेतन शाळेतील विद्यार्थ्याना शिक्षण घेण्याच्या वयात स्वतःच्या हक्कासाठी आंदोलनाचे फलक हाती घेण्याची वेळ आली होती. शाळेनं अचानक शाळा बंद होत असल्याची नोटीस पालकांना दिली. मात्र 'झी मीडिया'च्या दणक्यानं आता या विद्यार्थ्यांवरचं संकट टळलंय.

मुलुंड पश्चिम येथील ही आर आर एज्युकेशन ट्रस्ट ची रुद्राक्ष इन्टरनेशनल स्कूल. सिबिएससी बोर्डची परवानगी मिळण्यासाठी येथील जागा छोटी पडत आहे असं कारण देत ही शाळा म्हाडा कॉलनीतल्या अर्धवट बनलेल्या एका इमारतीत स्थलांतरीत करण्यात आली. पुढे हि शाळा शांती निकेतन एज्युकेशन ह्यां नावाने सुरु होती. मात्र अचानक शाळा बंद होणार असल्याच्या नोटीसा पालकांना मिळाल्या आणि त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. 

ऐन वेळी शाळा बंद होत असल्याच कळतात इतर शाळात प्रवेश घेण्यासाठी पैसे आणायचे कुठून हा प्रश देखील पालकांना पडला. शेवटी या पालकांनी झी मीडियाकडे दाद मागित शाळेविरोधात जन आंदोलन उभं केलं. झी मीडियाच्या प्रतिनिधींनी शाळेच्या मुख्याध्यापीकांना याचा जाब विचारला तेव्हा शाळा बंद करण्याची भाषा करणाऱ्या देवेंद्र ठक्कर अचानक परतल्या आणि आपण शाळा बंद केली नसल्याच त्यांनी सांगितलं.  

झी मीडियानं या तक्रारीचा पाठपुरावा केला आणि अखेरीस शाळा प्रशासनाला नमतं घ्यावं लागंलं. शाळा प्रशासनानं सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर या मुलांना इतर सीबीएससी दर्जाच्या शाळेत सामावून घेण्याचं आश्वासन दिलय. त्यामुळे पालकांनी समाधान व्यक्त केलंय. त्यांच्या या संघर्षात झी मीडियानं मदत केल्यामुळे या पालकांनी झी मीडियाचेही आभार मानलेत.

शाळा प्रशासनाच्या आश्वासनानंतर शांत बसणारे आम्ही नाहीत. जोपर्यंत या शाळेतील सर्व मुलांना दुस-या शाळेत सामावून घेतलं जाणार नाही तोपर्यंत झी मीडिया याचा शेवटपर्यत पाठपुरावा करतच राहील.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.